शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
6
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
7
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
8
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
9
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
10
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
11
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
12
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
13
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
14
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
15
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
16
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
18
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
19
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
20
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

'डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन': उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आयआयएम आणि जिल्हा प्रशासनामध्ये सामंजस्य करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 19:46 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या संदर्भातील सामंजस्य करारावर रविवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

आनंद डेकाटे -नागपूर : विकसित भारतासाठी राज्याची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर करण्याचे ध्येय आहे. हे ध्येय गाठण्यासाठी जिल्हा विकास आराखडा (डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन) महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. जिल्हा विकास आराखड्यात सुसूत्रता यावी व सुयोग्य नियोजन व्हावे यासाठी नागपूरच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेचे (आयआयएम) सहकार्य घेतले जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या संदर्भातील सामंजस्य करारावर रविवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

भारतीय व्यवस्थापन संस्था आणि जिल्हा प्रशासनामध्ये ‘डिस्ट्रीक्ट स्ट्रॅटेजिक प्लान’ संदर्भात हा सामंजस्य करार करण्यात आला. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मैत्री, संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी ले. कर्नल मकरंद अलुर यावेळी उपस्थित होते.

नागपूर जिल्ह्यास केंद्रस्थानी ठेवून आर्थिक वाढ व सकल उत्पन्न वाढीसाठी विशिष्ट नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या अंतर्गत जिल्ह्याचा सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतीय व्यवस्थापन संस्थेचे सहकार्य घेतले जाणार आहे.

जिल्हा विकास आराखडा तयार करताना जिल्ह्यातील संभाव्य संधी व त्या संधीचा वापर करून गुंतवणुकीच्या संबंधित क्षेत्रातील लक्ष्य गाठण्यासाठी अल्प ,मध्यम, दीर्घ मुदतीचे साध्य ठरवणे शक्य होणार आहे. या आराखड्याच्या माध्यमातून जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उद्योगांची संख्या, क्लस्टर पार्क ,हब,आयआयटी , महाविद्यालय, कारखाने आदींना विचारात घेऊन जिल्हा विकास आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शक सूचना व कालबद्ध कार्यक्रम आखता येणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस