शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांनी केले माती परीक्षण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 01:35 IST

मानवाच्या आरोग्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व जमिनीच्या आरोग्याला आहे. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांचे जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे जमिनीचा पोत घसरत चालला होता. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावरही होत होता. शासनाने मानवी आरोग्य जपण्यासाठी सोबतच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जमिनीच्या आरोग्य तपासणीसाठी अभियान राबवून शेतकऱ्यांना आवाहन केले. त्याचा परिणाम म्हणून नागपूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात २ लाख ४७ हजार शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेतले आहे.

ठळक मुद्देजमिनीचा पोत सुधारण्यास मदत : जमिनीत १६ अन्न घटकाचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मानवाच्या आरोग्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व जमिनीच्या आरोग्याला आहे. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांचे जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे जमिनीचा पोत घसरत चालला होता. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावरही होत होता. शासनाने मानवी आरोग्य जपण्यासाठी सोबतच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जमिनीच्या आरोग्य तपासणीसाठी अभियान राबवून शेतकऱ्यांना आवाहन केले. त्याचा परिणाम म्हणून नागपूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात २ लाख ४७ हजार शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेतले आहे.जमिनीची उत्पादकता ही १६ अन्न घटकांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. यात मुख्य घटक म्हणजे हायड्रोजन, आॅक्सिजन, कर्ब, नत्र, स्फुरद व पलाश आहे. त्याचबरोबर इतर घटकांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, लोह, मंगल, तांबे, जस्त, मॉलिब्डेनम, बोरॉन, क्लोरीन यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खत, कीटकनाशकाचा अनावश्यक वापर केला आहे. त्यामुळे जमीन ही पिकांसाठी अनारोग्य ठरत आहे. अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकांवर परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होत आहे. जमिनीचे आरोग्य बिघडण्याचा धोका लक्षात घेऊन, संयुक्त राष्ट्राच्या ६८ व्या सर्वसाधारण सभेत २०१५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. केंद्र सरकारने तर मृदा सर्वेक्षणाच्या बाबतीत मृद आरोग्यपत्रिका अभियानच राबविले आहे. याअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या सहाय्याने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्यपत्रिका ही योजना २०१५ पासून कार्यान्वित करण्यात आली आहे.जिल्हा मृद चाचणी व मृदा सर्वेक्षण कार्यालयांतर्गत २ लाख ६८ हजार शेतकऱ्यांची नोंद आहे. यातील २०१७-१८ मध्ये १ लाख १६ हजार शेतकऱ्यांनी मातीची तपासणी केली आहे तर २०१८-१९ मध्ये १ लाख ३१ हजार शेतकऱ्यांनी तपासणी केली आहे. दोन वर्षातून एकदा शेतकऱ्यांनी तपासणी करणे गरजेचे आहे. आरोग्यपत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जमिनीचा रासायनिक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्रव्याची पातळी, सूक्ष्म मूलद्रव्य कमतरता आदी माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. त्यामुळे खतांचा संतुलित व कार्यक्षम वापरास प्रोत्साहन मिळत आहे.अर्चना कोसरे, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर