शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात रेती-गिट्टी व्यावसायिकांत संघर्ष पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:41 IST

रेती व्यावसायिकांमधील रक्तरंजित संषर्घ जगजाहीर असताना आता रेती आणि गिट्टी व्यावसायिकांमधील संघर्ष चव्हाट्यावर येत आहे. शासकीय नियमांमुळे यांच्यातील संघर्षाची ठिणगी पडली. रेती व गिट्टी हे गौण खनिज असताना केवळ रेतीच्याच वाहतुकीवर रात्री बंदी का, असा युक्तिवाद करीत रेती वाहतूकदारांनी गिट्टीचे ओव्हरलोड ट्रक अडविले आणि प्रकरण पोलिसात पोहोचले. एवढेच नव्हे तर या वाहतूकदारांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही केली.

ठळक मुद्देगिट्टीचे ओव्हरलोड ट्रक रोखले : वाहतूकदारांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

अरुण महाजन। लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (खापरखेडा) : रेती व्यावसायिकांमधील रक्तरंजित संषर्घ जगजाहीर असताना आता रेती आणि गिट्टी व्यावसायिकांमधील संघर्ष चव्हाट्यावर येत आहे. शासकीय नियमांमुळे यांच्यातील संघर्षाची ठिणगी पडली. रेती व गिट्टी हे गौण खनिज असताना केवळ रेतीच्याच वाहतुकीवर रात्री बंदी का, असा युक्तिवाद करीत रेती वाहतूकदारांनी गिट्टीचे ओव्हरलोड ट्रक अडविले आणि प्रकरण पोलिसात पोहोचले. एवढेच नव्हे तर या वाहतूकदारांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही केली.योगेश डोंगरे हे रेती वाहतूकदार असून, त्यांच्या नेतृत्वातील काही रेती वाहतूकदारांनी गुरुवारी रात्री खापा (ता. सावनेर) पोलीस ठाण्यासमोर गिट्टीचे दोन ट्रक अडविले. शिवाय, पोलिसांना बोलावून ती गिट्टीची ओव्हरलोड वाहतूक असल्याचे निदर्शनास आणून दिले. रेती व गिट्टी गौण खनिज असताना रात्रीच्या वेळी रेती वाहतुकीवर बंदी का घालण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करत गिट्टीची रात्री होणाऱ्या वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी पोलीस अधिकाºयांकडे करण्यात आली.ही बाब नियमात बसत नसल्याचे पोलीस अधिकारी वारंवार सांगत होते. मात्र, रेती वाहतूकदार काहीही ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे रेती वाहतूकदार योगेश गोखे यांनी सावनेरच्या उपविभागीय अधिकारी (महसूल) वर्षाराणी भोसले यांना या प्रकाराबाबत माहिती दिली. भोसले यांनी लगेच महसूल निरीक्षक (आरआय) राठोड यांना कारवाई करण्यासाठी घटनास्थळी पाचारण केले. मात्र, रात्रीच्या वेळी गिट्टीच्या वाहतुकीवर बंदी नसल्याचे सांगून त्यांनी कारवाई करण्यास नकार दिला. शिवाय, त्यांनी गिट्टीच्या ट्रकची क्षमताही न तपासल्याने रेती वाहतूकदारांनी पोलीस ठाण्यासमोर धुमाकूळ घालायला सुरुवात केली.दरम्यान, सावनेर, खापा, कळमेश्वर, खापरखेडा, पाटणसावंगी, दहेगाव (रंगारी), कोराडी येथील रेती वाहतूकदारांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयामोर निदर्शने केली; शिवाय जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना निवेदन दिले.रेतीच्या उपशावरही बंदीरात्रीच्यावेळी रेतीच्या वाहतुकीसोबतच उपशावरही बंदी घालण्यात आली आहे. रेतीचा उपसा आणि वाहतूक ही सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत करण्याची नियमानुसार परवानगी देण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात मध्य प्रदेश तसेच भंडारा जिल्ह्यातून रात्रभर रेतीची अवैध वाहतूक खुलेआम केली जात आहे. रेती वाहतूकदार एकाच रॉयल्टीचा उपयोग वारंवार करीत असून, क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक केली जाते. या बाबी कंत्राटात नमूद केल्या असतानाही त्यांची पायमल्ली केली जाते.धाबे दणाणलेमहसूल विभाग तसेच सावनेर व खापा पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईमध्ये अवैध रेतीवाहतुकीचे काही ट्रक पकडले. त्यात अमित राय यांचे तीन तर, स्वप्नील तळेकर, राजेंद्र पौनीकर, गुलाब राय, विक्की लुल्ला, कृष्णा यादव यांच्या प्रत्येकी एका ट्रकचा समावेश आहे. ही कारवाई रात्रीच्यावेळी करण्यात आली असून, रेतीचे ट्रक ओव्हरलोड होते. या कारवाईमुळे रेती वाहतूकदार चिडले आणि त्यांनी त्यांचा रोष गिट्टीचे ट्रक अडवून व्यक्त केला.

टॅग्स :agitationआंदोलनsandवाळू