शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे क्रिकेट सट्ट्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 22:25 IST

स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मौदा शहरातील जिराफे ले आऊट भागात सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड टाकली. त्यात चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १७ लाख ६ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली.

ठळक मुद्देचौघांना अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (मौदा) : स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मौदा शहरातील जिराफे ले आऊट भागात सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड टाकली. त्यात चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १७ लाख ६ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली.राजू कोमलचंद जैन (४५, रा. इतवारी, नागपूर), मनोज चंदूभाई गडिया (४३, रा. लकडगंज, नागपूर), हरिओम रमेश जुनेजा (३५, रा. हिवरीनगर, नागपूर) व अमोल गोविंद इलमकर (२८, रा. यशोधरानगर, नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मौदा शहरातील जिराफे ले आऊट येथील संजय जागोजी मदनकर यांच्या घरी क्रिकेट सामन्यावर सट्टा स्वीकारला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री बनावट ग्राहकाला पाठवून खात्री पटवून घेतली. तिथे भारत - ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यावर सट्टा स्वीकारला जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पथकाने लगेच धाड टाकली.त्यात चौघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. शिवाय, त्यांच्याकडून एमएच-४९/एई-२६०० क्रमांकाची कार, सेट टॉप बॉक्स, ३९ मोबाईल हॅण्डसेट, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, लाईन मशीन असा एकूण १६ लाख ९१ हजार रुपये किमतीचे साहित्य आणि १५ हजार ४०० रुपये रोख असा एकूण १७ लाख ६ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी मौदा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे, उपनिरीक्षक नरेंद्र गौरखेडे, सहायक फौजदार लक्ष्मीप्रसाद दुबे, चंद्रशेखर घडेकर, अविनाश राऊत, दुर्गाप्रसाद पारडे, प्रणयसिंग बनाफर, अश्विनी मोहोड, साहेबराव बहाळे यांच्या पथकाने केली.

 

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीraidधाड