शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
2
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
3
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
4
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
5
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा
6
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
7
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
8
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
9
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
10
रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?
11
"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
12
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
13
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
14
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट
15
RBI नं १० वर्षांच्या वरील मुलांसाठी बँक अकाऊंटचे नियम बदलले, खातं उघडण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
17
भाजपाला शह देण्याची एकनाथ शिंदेंची रणनीती; नवी मुंबईतले १२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत येणार
18
ज्येष्ठांसाठी बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
19
ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, आपत्कालीन स्लाइड्स वापरून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले
20
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ

जिल्हा परिषद निवडणूक; बावनकुळे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 13:41 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सुरू झालेल्या मतदानात माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सुरू झालेल्या मतदानात माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला.कोराडी ग्रामपंचायत येथे त्यांनी मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ. ज्योतीताई बावनकुळे, मुलगा संकेत व कन्या पायल आष्टानकर होते.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात ही निवडणूक होत असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपचा प्रभाव कमी करण्यासाठी तीन मंत्र्यांना हा भार सोपविला आहे. त्यामुळे ही निवडणूक नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई ठरत आहे. जिल्हा परिषदेच्या ५८ सर्कलसाठी २७० तर पंचायत समितीच्या ११६ गणासाठी ४९७ उमेदवार रिंगणात आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षासह गोंडवाना गणतंत्र पाटील, प्रहार, बहुजन वंचित विकास आघाडी या पक्षाचेही उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे १३ उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच २४७ झोन अधिकारी यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय एकूणच निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे ८,५०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यात १४,१९,७७० मतदार आहेत. यापैकी ७,३६,६४३ पुरुष व ६,८३,०५४ महिला मतदार आहेत. सोमवारी दुपारपर्यंत सर्व पोलीस पार्टी मतदान केंद्रावर रवाना झाल्या होत्या.१८२८ मतदान केंद्रांवर मतदानजि. प. ५८ गट व पं. स. ११६ गणासाठी १८२८ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यापैकी १८२ मतदान केंद्रे आदर्श मतदान केंद्रे म्हणून सजविण्यात येणार आहेत. यापैकी २७ मतदान केंद्रे संवेदनशिल आहेत.दोन बटन दाबल्यानंतर वाजणार बीबया निवडणुका राज्य निवडणूक आयोगाच्या मशिनीवर होणार असल्याने त्यात केवळ मेमरी चिप आहे. त्यामुळे या निवडणुका ‘व्हीव्हीपॅट’विनाच होणार आहेत. एकाच ईव्हीएमवर जि.प. व पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे. मतदाराला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवाराला मतदान करायचे आहे. त्यामुळे दोन बटन दाबल्यानंतरच बीब वाजणार आहे.नागपूर ग्रामीणमध्ये सर्वाधिक मतदारनागपूर ग्रामीण तालुक्यात सर्वाधिक २३३ मतदान केंद्र व सर्वाधिक १,९८, ८८५ मतदार आहेत.भिवापूर तालुक्यात सगळ्यात कमी ८६ मतदान केंद्र व सर्वात कमी ५७,११८ मतदार आहेत.पोलिसही सज्जया निवडणुकीसाठी तब्बल चार हजार पोलिसांचा ताफा जिल्ह्यात व शहरात तैनात करण्यात आला. ग्रामीण भागातील १६ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. बंदोबस्तात ग्रामीण पोलिसांकडून एक अधीक्षक, एक अतिरिक्त अधीक्षक, सहा पोलीस उपअधीक्षक, २८ पोलीस निरीक्षक, ११७ सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, १७८८ पोलीस कर्मचारी, १४०० होमगार्ड व राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी नागपूर जिल्ह्यात तैनात करण्यात आली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक