शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

जिल्हा बँकेला जुलैमध्ये परवाना मिळणार

By admin | Updated: June 10, 2014 01:04 IST

नागपूर जिल्हा बँकेला जूनअखेरीस किंवा जुलै महिन्यात रिझर्व्ह बँकेचा आर्थिक परवाना मिळण्याची शक्यता असल्याची अधिकृत माहिती आहे. बँकेची आर्थिक स्थिती २१ दिवसांत स्पष्ट करण्याचे आदेश देताना

२0 जूनला हायकोर्टात सुनावणी : शासनाची ९३ कोटींची मदतनागपूर : नागपूर जिल्हा बँकेला जूनअखेरीस किंवा जुलै महिन्यात रिझर्व्ह बँकेचा आर्थिक परवाना मिळण्याची शक्यता असल्याची अधिकृत माहिती  आहे. बँकेची आर्थिक स्थिती २१ दिवसांत स्पष्ट करण्याचे आदेश देताना हायकोर्टाचे अवकाशकालीन न्यायाधीश भूषण गवई यांनी रिझर्व्ह बँकेच्या  आदेशावर स्थगिती दिली होती. २0 जूनला सुनावणी असून त्यानंतर स्थिती स्पष्ट होणार आहे. राज्य सरकारने कॅबिनेटच्या बैठकीत नागपूर जिल्हा बँकेला ९३ कोटींच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. ही मदत भागभांडवलाच्या स्वरुपात  बँकेला मिळेल.९३ कोटींच्या मदतीनंतर रिझर्व्ह बँकेचा परवाना मिळण्यास बँकेला अडचण जाणार नाही. त्यानंतर बँकेचे व्यवहार सुरळीत होतील, अशी अपेक्षा आहे.  रिझर्व्ह बँकेच्या आदेशावर हायकोर्टाने स्थगिती दिल्यानंतर सध्या तरी बँकेचे आर्थिक व्यवहार सुरळीत सुरू आहेत. जिल्हा बँकेत अंदाजे ८५0 कोटींच्या ठेवी असून त्यात वैयक्तिक ठेवी ६0 कोटी, नागरी बँकांचे ७.४७ कोटी, कृषी सोसायट्यांचे ६.७२ कोटी, जिल्हा  परिषद व पंचायत समित्यांचे १२५ कोटी आणि इतर सोसायट्यांच्या ७६.१९ कोटींच्या ठेवी आहे.शासनाने मदत घोषित केल्याने या ठेवी सुरक्षित राहतील, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे. मदतीनंतर बँकेचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी  आणखी सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे. यावर्षी शेतकर्‍यांना कर्ज दिले नसले तरीही शासनाची मदत आणि राज्य बँकेकडून कर्ज स्वरुपात  मिळालेल्या रकमेतून पुढील वर्षी जिल्हा बँक शेतकर्‍यांना कर्ज वाटप करू शकते.(प्रतिनिधी)