शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपाच्या १५७ सफाई कामगारांना स्थायी नियुक्ती आदेशाचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 22:45 IST

नागपूर महापालिकेमधील १५७ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशींतर्गत स्थायी नियुक्ती आदेशाचे तसेच महापालिकेत काम करताना मृत पावलेल्या व अपघातामुळे कामावर रुजू न होऊ शकलेल्या ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीचे कार्ड उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अभिजित बांगर हस्ते शुक्रवारी वितरण करण्यात आले.

ठळक मुद्देलाड पागे समिती शिफारशींची अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिकेमधील १५७ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशींतर्गत स्थायी नियुक्ती आदेशाचे तसेच महापालिकेत काम करताना मृत पावलेल्या व अपघातामुळे कामावर रुजू न होऊ शकलेल्या ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीचे कार्ड उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अभिजित बांगर हस्ते शुक्रवारी वितरण करण्यात आले.मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित कार्यक्रमात आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांच्या हस्तलकडगंज झोनचे सभापती दीपक वाडीभस्मे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे, एसबीएम विकास कौन्सिलचे अध्यक्ष सतीश सिरसवान, आरोग्य विभागाचे किशोर मोटघरे, राजेश लवारे, विशाल मेहता उपस्थित होते.सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्ती देणे व जमादारांच्या वारसांना नियुक्ती कार्ड मिळवून देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे कार्य केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही वेळोवेळी या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा करून सर्व समस्या मार्गी लावल्या. त्यामुळे आज १५७ कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश मिळत आहेत. मात्र या नियुक्तीसंदर्भात मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांनी पुढाकार घेतला असला तरी यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचेही मोठे योगदान असल्याचे संदीप जोशी म्हणाले.सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर माजी महापौर प्रवीण दटके व तत्कालीन सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात लाड पागे समितीच्या शिफारशींतर्गत नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. मलवाहक जमादारांच्या नेत्यांकडूनही वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे या समस्या तातडीने मार्गी लावता आल्या, असेही सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी यावेळी सांगितले.नागपूर शहर स्वच्छ, सुंदर होत आहे. शहराला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. यात सफाई कर्मचाºयांचे महत्त्वाचे योगदान आहे. आपले शहर स्वच्छ, सुंदर राहावे यासाठी शहरातील घाण साफ करण्याचे मौलिक कार्य हे सफाई कर्मचारी करतात. असे प्रतिपादन उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी यावेळी केले.सर्व ऐवजदार, सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधीसोबत बैठक आयोजित केली. यामध्ये सर्व ऐवजदारांना मनपामध्ये स्थायी नोकरी देणे व ऐवजदारांच्या वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू करून त्यांना नोकरी देण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. सर्व ऐवजदारांना लाड-पागे समितीच्या शिफारशींतर्गत मनपामध्ये स्थायी नोकरी देण्याचा निर्णय घेतला होता.अनेक वर्षापासून प्रशासनाकडूनही न सुटू शकलेले हे प्रश्न सोडविण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी विशेष पुढाकार घेत सर्व प्रशासकीय अडथळ्यांचा अभ्यास करून सफाई कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे महत्त्वाचे कार्य केले. या कार्यामध्ये अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, अझीझ शेख यांचीही मौलिक भूमिका आहे.वारसांना नियुक्तीचे कार्ड प्रदाननागपूर महापालिकेमध्ये काम करताना मृत पावलेले व अपघातामुळे कामावर रुजू न होऊ शकलेल्या ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांच्या तीन वारसांना नियुक्तीचे कार्ड यावेळी प्रदान करण्यात आले. यामध्ये सौम्य कन्हैया बिरहा, मंजू दर्पण खरे व जितेंद्र भीमराव टेंभरे यांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीचे कार्ड देण्यात आले. इतरांना कार्ड वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारी