शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
4
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
5
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
6
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
7
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
8
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
9
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
10
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
11
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
12
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
13
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
14
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
16
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
17
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
18
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
19
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
20
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा

मोठ्या बँकांद्वारे बनावट नोटांचे वितरण ! नागपूरच्या चलनामध्ये 'फेक करन्सी' फिरत आहे

By योगेश पांडे | Updated: September 10, 2025 19:16 IST

१५ दिवसांत तीन जणांविरोधात गुन्हे दाखल : थेट 'आरबीआय' कार्यालय व 'एसबीआय' एटीएममध्येच बनावट नोटा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सणासुदीच्या तोंडावर उपराजधानीतील चलनात बनावट नोटा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मागील १५ दिवसांतच तीन वेगवेगळ्या प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे तीनही गुन्हे हे बँक किंवा एटीएमच्या माध्यमातून बनावट नोटा चलनात मिळण्याचे प्रयत्न झाले. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे यातील एका प्रकरणाचा खुलासा स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या एटीएममधून झाला, तर दोन गुन्हे थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात आढळलेल्या बनावट नोटांच्या आधारे दाखल झाले.

जर या मोठ्या बँकांमध्येच बनावट नोटा आढळल्या आहेत, तर शहरात इतर चलनात या नोटा किती प्रमाणात फिरविण्यात आल्या आहेत, हा मोठा प्रश्न यंत्रणांसमोर उपस्थित झाला आहे. पहिला मोठा प्रकार कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एसबीआयच्या 'एटीएम'मध्ये समोर आला. 'एसबीआय'च्या कामठीच्या गरूड चौकाजवळील शाखेत ऑटोमॅटिक डिपॉझिट कम विड्रॉवल मशीन आहे. त्यात अनेक जण दररोज मोठ्या प्रमाणावर पैसे डिपॉझिट करतात. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला त्यातील ट्रे भरला व त्यामुळे ती रक्कम काढण्यात आली. मशीनच्या 'रिजेक्टेड बिन'मध्ये ५०० रुपयांच्या ३८ नोटा आढळल्या. त्या नोटांची तपासणी केली असता त्या सर्व बनावट असल्याचे आढळून आले. मशीनजवळ लागलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासणी केली असता कामठीतील बजरंगनगरमधील आकाश रविशंकर यादव याने त्या नोटा जमा केल्या होत्या. तेथील व्यवस्थापक अमोल राऊत यांच्या तक्रारीनुसार यादवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बनावट नोटांना ओळखणे महत्त्वाचे

सणासुदीच्या कालावधीत रोखीद्वारेच अनेकांकडून व्यवहार करण्यात येतात. विशेषतः किराणा सामान, दागिने, कपडे घेताना रोखीवरच भर असतो. गर्दीच्या ठिकाणी बनावट नोटा सहज खपविल्या जातात. बनावट नोटांना वेळीच ओळखून पोलिसांना त्याची माहिती देणे महत्त्वाचे ठरते. बँकांमध्ये नोटा आढळल्यावर तक्रार करण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे व अनेकदा ग्राहकांनादेखील त्यांच्याकडे बनावट नोटा कुठून आल्या याची कल्पना नसते. या वेळखाऊ प्रक्रियेत यामागील खरे आरोपी सहज निसटून जातात.

'आरबीआय'मधील 'बॉक्स'मध्येदेखील बनावट नोटा

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयातील 'बॉक्स'मध्येदेखील बनावट नोटा आढळल्याचा प्रकार समोर आला. संबंधित नोटा फेब्रुवारी व मे महिन्यात बॉक्समध्ये टाकण्यात आल्या होत्या, संबंधित टीएलआर बॉक्समध्ये जुन्या व फाटक्या नोटा बदलून मिळतात. त्यासाठी ग्राहकांना त्यांचे आधार कार्ड, बँकेचे तपशील द्यावे लागतात. या बॉक्समध्ये फेब्रुवारी महिन्यात १०० रुपयांच्या ११ बनावट नोटा आढळल्या. त्या प्रकरणात सहायक व्यवस्थापिका भैरवी खरतड यांच्या तक्रारीवरून भूषण दिलीप पाटील (वय ३५, चितोड मार्ग, धुळे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर मे महिन्यात पाच बनावट नोटा आढळल्या. त्या नोटा निहारिका नावाच्या तरुणीने बॉक्समध्ये टाकल्या होत्या. तिला बँकेत बोलविण्यात आले. मात्र, तिच्याकडून काहीच प्रतिसाद न आल्याने खरतड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. बनावट नोटा आढळल्यावर प्राथमिक तपासणीनंतरच बँकाकडून तक्रार करण्यात येते. हे दोन्ही गुन्हे याच आठवड्यात दाखल झाले आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरfraudधोकेबाजीSBIएसबीआयReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक