शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २५,२८७ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:21 IST

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी व खरीप हंगाम पीक कर्जवाटपाचा लाभ देण्यात येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खातेदार असलेले जिल्ह्यातील २५२८७ शेतकऱ्यांच्या सातबारावरील बोजा कमी करून शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ देणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची माहिती  

लोकमत न्यूज  नेटवर्क  नागपूर : जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी व खरीप हंगाम पीक कर्जवाटपाचा लाभ देण्यात येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खातेदार असलेले जिल्ह्यातील २५२८७ शेतकऱ्यांच्या सातबारावरील बोजा कमी करून शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ देणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे काम सुरू आहे. कर्जमाफी, एकरकमी कर्ज परतफेड व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अशा विविध घटकांचा लाभ दिला जात आहे. सन २०१७ मध्ये जिल्ह्यातील ५९४०१ शेतकऱ्यांनी कर्जमाफी व नवीन पीक कर्जाचा लाभ घेत शेतातील उत्पन्न प्राप्त केले होते. यावर्षी देखील जिल्हा प्रशासनाच्यावतीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या सातबारावरील पीक कर्जाचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.खरीप हंगाम २०१८ अंतर्गत १५ जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खातेदार असलेले २५२८७ शेतकऱ्यांच्या सातबारावरील कर्जाचा बोजा कमी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २५ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना १५ जूनपर्यत खरीप हंगामासाठी नवीन पीक कर्जाचा लाभ मिळेल, असे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीnagpurनागपूर