शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

३ दिवसात १३५ कोटींचे वाटप : नागपूर मनपा कंत्राटदारांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:38 IST

दिवाळीपूर्वी राज्य सरकारने शहरातील विकास कामांसाठी महापालिकेला १५० कोटींचा निधी उपलब्ध केला. आता जीएसटी अनुदानाची गेल्या तीन महिन्याची थकबाकी म्हणून १०१. ७९ कोटी महापालिकेच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. या रकमेतून कंत्राटदारांची १३५ कोटींची थकबाकी तीन दिवसात देण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देजीएसटी अनुदाची १०१.७९ कोटींची थक बाकी मिळाली

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दिवाळीपूर्वी राज्य सरकारने शहरातील विकास कामांसाठी महापालिकेला १५० कोटींचा निधी उपलब्ध केला. आता जीएसटी अनुदानाची गेल्या तीन महिन्याची थकबाकी म्हणून १०१. ७९ कोटी महापालिकेच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. या रकमेतून कंत्राटदारांची १३५ कोटींची थकबाकी तीन दिवसात देण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी नागपूर शहराचे जीएसटी अनुदान ८६.५० कोटी करण्यात आले. यापूर्वी दर महिन्याला ५२.५७ कोटी मिळत होते. सप्टेंबरपासून वाढीव अनुदान मंजूर केले. त्यानुसार गेल्या तीन महिन्यातील अनुदानाच्या फरकाची रक्कम १०१.७९ कोटी महापालिकेच्या खात्यात जमा झाले आहे.जीएसटी अनुदाची रक्कम जमा झाल्याने या रकमेतून कंत्राटदारांची थकबाकी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करण्यात आलेल्या हुडकेश्वर- नरसाळा सिमेंट काँक्रीट रोडचे सप्टेंबर २०१८ पर्यंतचे बिल देण्यात येणार आहे. तसेच कंत्राटदारांची मार्च ते जुलै २०१८ मधील थकबाकी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यात मार्चचे १० कोटी एप्रिलचे ६.८४ कोटी, मे ११.०८ कोटी, जून ९.०२ कोटी व जुलै महिन्यातील २०.४६ कोटींचा समावेश आहे. यातील ४० टक्के रक्कम दिवाळीला देण्यात आली. कंत्राटदारांची संपूर्ण थकबाकी दिली जाणार असल्याचे वीरेंद्र कुकरेजा यांनी सांगितले.उपद्रव शोध पथकाची जबाबदारी निश्चितआरोग्य विभागातील संख्याबळ व या विभागाचे महत्त्व लक्षात घेता शहरातील स्वच्छतेसाठी उपद्रव शोध पथक गठित करण्यात आले आहे. यात कंत्राटी तत्त्वावर ४४ माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचा ११ महिन्यांचा कालावधी संपला. पथकाची गरज लक्षात घेता त्यांची सेवा वाढविण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. सोबतच उपद्रव शोध पथकाची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश सहायक आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली. यासाठी सेवा-शर्तींचा अर्ज भरून घेण्यात यावा. शहरातील अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी या पथकाचा अधिक उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच प्रभागात स्वच्छता राहावी. यासाठी पथकातील जवानांनी नगरसेवकांचा सहभाग घ्यावा, याबाबतची माहिती सादर करावी, असे निर्देश देण्यात आले.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfundsनिधी