नृत्याविष्कार स्पर्धेचे पुरस्कार वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:03 AM2021-05-04T04:03:23+5:302021-05-04T04:03:23+5:30

- देशभरातील २७५ स्पर्धकांचा सहभाग लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नृत्य परिषद महाराष्ट्र, विदर्भ विभागाच्या वतीने आयोजित अखिल भारतीय ...

Distributed prizes of dance discovery competition | नृत्याविष्कार स्पर्धेचे पुरस्कार वितरित

नृत्याविष्कार स्पर्धेचे पुरस्कार वितरित

googlenewsNext

- देशभरातील २७५ स्पर्धकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नृत्य परिषद महाराष्ट्र, विदर्भ विभागाच्या वतीने आयोजित अखिल भारतीय ऑनलाईन नृत्य स्पर्धा ‘नृत्याविष्कार २०२१’चे आयोजन झाले. स्पर्धेचे पुरस्कार वितरित करण्यात आले.

पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नृत्य परिषद महाराष्ट्रचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शर्वरी जेमिनिस, फुलवा खामकर, श्रीमती माडखोलकर, भूपेश मेहर, तमन्ना नायर, रागिणी मक्खर, रत्नाकर शेळके, जतीन पांडे, वैष्णवी पाटील, विनय कुमार, दीपक बिडकर उपस्थित होते. निवेदन श्वेता शेलगावकर यांनी केले. स्पर्धेच्या विविध जबाबदाऱ्या कुणाल आनंदम, ऋषिकेश पोहनकर, विशाल क्रेग, अवंती हर्षे काटे, दशरथ सिन्हा, सचिन नारनवरे, ग्रीष्मा यादव, स्वप्निल भिसे, रामेश्वरी चौधरी यांनी पार पाडल्या. या स्पर्धेत देशभरातून २७५ स्पर्धक सहभागी झाले.

------------------

स्पर्धेतील प्रथम पुरस्कार विजेते

क्लासिकल डान्स

अनया जॉयस - सब ज्युनियर श्रेणी

विदुषी डावर - ज्युनियर श्रेणी

शिवानी सहस्रबुद्धे - सिनियर श्रेणी

गौतम राज - ओपन श्रेणी

लोकनृत्य

स्वरा लोणारे - सब ज्युनियर श्रेणी

आदिती पवार - ज्युनियर श्रेणी

कृष्णा सोनी - सिनियर श्रेणी

प्रिया नासकर - ओपन श्रेणी

वेस्टर्न डान्स

सिया पाटील - सब ज्युनियर श्रेणी

हर्षदा बंडल - ज्युनियर श्रेणी

कुणाल मोहोड - सिनियर श्रेणी

राधिका टांक - ओपन श्रेणी

...............

Web Title: Distributed prizes of dance discovery competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.