सहाय्यक निवडणूक निरीक्षक म्हणून नरखेड, काटोल, कळमेश्वर, सावनेर व पारशिवनीसाठी प्रादेशिक चौकशी अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, रामटेक, मौदा, उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यांकरिता नोंदणी उपमहानिरीक्षक मुद्रांक शुल्क तथा अपर जिल्हाधिकारी पराते व कामठी, नागपूर (ग्रा.) तसेच हिंगणा तालुक्याकरिता उपायुक्त (रोहयो) तसेच अपर जिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर संपर्क अधिकारी म्हणून बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर, खंड विकास अधिकारी म्हणून बाळासाहेब यावले, महेंद्र डोंगरे व सुभाष जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवार, २७ सप्टेंबर रोजी मुन हे निवडणुकीच्या पूर्वतयारीची पाहणी करणार आहेत.
जि. प. पोटनिवडणुकीसाठी विनय मुन मुख्य निरीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:08 IST