शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

संभाजींचा इतिहास नसानसात भिनावा : अमोल कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 23:06 IST

विदर्भात पहिल्यांदा शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन होत आहे ही शिवभक्त आणि कलावंत म्हणून आनंदाची बाब आहे. महानाट्यातून युवा पिढीवर संस्कार करण्याचे काम होत असून संभाजी राजे सर्वांच्या नसानसात भिनण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवपुत्र संभाजी महानाट्यात संभाजी राजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

ठळक मुद्देविदर्भात पहिल्यांदाच शिवपुत्र संभाजी महानाट्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात पहिल्यांदा शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन होत आहे ही शिवभक्त आणि कलावंत म्हणून आनंदाची बाब आहे. महानाट्यातून युवा पिढीवर संस्कार करण्याचे काम होत असून संभाजी राजे सर्वांच्या नसानसात भिनण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवपुत्र संभाजी महानाट्यात संभाजी राजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान आणि मोहन मते मित्र परिवारातर्फे ऐतिहासिक शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन २२ ते २८ डिसेंबरदरम्यान रेशीमबाग मैदानावर करण्यात आले आहे. या नाटकात संभाजी राजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, संभाजी महाराजांचे चरित्र नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी या महानाट्याची निर्मिती करण्यात आली आहे. हे केवळ महानाट्य नसून महाराष्ट्रातील मातीचा संस्कार आहे. हा संस्कार महाराष्ट्र आणि इतर राज्यात पोहोचविण्याचा मानस आहे. महाराष्ट्रात शिवपुत्र संभाजीचे १३६ प्रयोग झाले. आजपर्यंत विदर्भात संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचला नव्हता. त्यामुळे विदर्भात महानाट्याचे आयोजन ही खरोखरच आनंदाची बाब आहे. आजपर्यंत घडले नाहीत असे उदंड प्रतिसादाचे प्रयोग नागपुरात घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, महानाट्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवाजी महाराजांवर एकही चित्रपट निघाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी आमदार मोहन मते यांनी महानाट्याची तयारी अंतिम टप्प्यात असून नागपूरचे वातावरण संभाजीमय झाले असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेला माजी महापौर प्रवीण दटके, संजय खुळे, बिज्जु पांडे, राजेश छाबरानी, शाम दलाल, तुषार फडणवीस, शशी शुक्ला, पंकज ठाकरे, विश्वास महादुरे, बंटी कुकडे उपस्थित होते.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीnagpurनागपूर