शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

नागपुरात ‘रेड झोन’च्या अट्टहासामुळे नागरिकांमध्ये असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 21:01 IST

शहरातील केवळ काही वस्त्या वगळता इतर भागात कोरोना प्रादुर्भाव नाही. त्यामुळे या भागात उद्योगधंदे सुरू करून नागरिकांना दिलासा देणे अपेक्षित होते. परंतु केवळ मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अट्टहासामुळे नागपूर शहर रेड झोनमध्ये सामील करण्यात आले. या निर्णयामुळे शहरातील सर्वपक्षीय नेत्यांसोबतच नागरिकांमध्येही असंतोष पसरला असून याचा भडका केव्हाही उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देभडका उडण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील केवळ काही वस्त्या वगळता इतर भागात कोरोना प्रादुर्भाव नाही. त्यामुळे या भागात उद्योगधंदे सुरू करून नागरिकांना दिलासा देणे अपेक्षित होते. परंतु केवळ मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अट्टहासामुळे नागपूर शहर रेड झोनमध्ये सामील करण्यात आले. या निर्णयामुळे शहरातील सर्वपक्षीय नेत्यांसोबतच नागरिकांमध्येही असंतोष पसरला असून याचा भडका केव्हाही उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मोमिनपुरा, संतरंजीपुरा, शांतिनगर या वस्त्यांमध्ये काही रुग्ण आहेत. इतर ठिकाणी फारसे रुग्ण नाहीत. नागपूरची सध्याची स्थिती पाहता आजवर ४०९ रुग्ण आढळले. त्यातील सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर २९८ जण आजारातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच सध्या नागपुरात १०४ रुग्ण आहेत. यात तीन जण जिल्ह्याबाहेरचे आहेत. बाधित वस्त्यांना सील करून तेथील नागरिकांची आरोग्य तपासणी, चाचण्या मोठ्या प्रमाणावर करण्याची सूचना करण्यात आली आहे. परंतु त्यासाठी उर्वरित शहरातील जनजीवन विस्कळीत करण्यात काहीच अर्थ नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. परंतु आयुक्त मुंढे यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना विनाकारण बंदिस्त राहावे लागत आहे. काही कंटेन्मेंट परिसरात नागरिकांना बळजबरीने क्वारंटाईन केले जात आहे. गड्डीगोदाम भागात या विषयावरून नागरिकांनी विरोधही केला होता. नागरिक स्वत: क्वारंटाईन होण्यास तयार होते; परंतु त्यांना प्रशासनाकडून त्याबाबतचे पत्र हवे होते, मात्र तशी कुठलीही रीतसर माहिती न देता नागरिकांना घेऊन जात असल्याने नागरिकांनी विरोध दर्शविला होता. अशीच मनमानी क्वारंटाईन सेंटर सुरू करण्याबाबतही दिसून आली. वस्त्यांमध्ये उघडणाऱ्या क्वारंटाईन सेंटरला स्थानिक नागरिकांचा विरोध पत्करावा लागला होता.लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यापार, धंदे बंद आहेत. नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. तब्बल दोन महिन्यानंतर सर्व काही सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा होती. कंटेन्मेंट परिसर सोडून उर्वरित शहरातील नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु केवळ मनपा आयुक्त मुंढे यांनी ते होऊ दिले नाही. आणखी काही दिवस रेड झोन कायम करण्यात आला. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांसोबत नागरिकही संतप्त झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर