शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

काटोल तालुक्यात रेशन वितरणात गडबड : कार्डधारकांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 19:31 IST

Nagpur : काटोल तालुक्यातील मार्लेगाव रेशन दुकानातील प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्ककाटोल : पावसाळ्यात रेशनकार्ड धारकांना अन्नपुरवठा करण्यात अडथळा येऊ नये, त्यामुळे एकाच वेळी तीन महिन्यांचे रेशन जून महिन्यात कार्डधारकांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला. याची अंमलबजावणी सध्या काटोल तालुक्यात सुरू आहे. परंतु, तालुक्यातील माळेगाव येथील रेशन विक्रेत्याकडून एका कार्डधारकाकडून एका महिन्याच्या रेशनवर एक किलोचा कट अशाप्रमाणे तीन महिन्यांचा तीन किलोचा कट लावण्याचा प्रकार समोर आल्याने गोंधळ उडालेला आहे.

पूरबाधित गावांना धान्य पुरवठा करण्यात प्राधान्य दिले जात आहे. दरवर्षी नदी व नाल्यांमुळे रेशनकार्ड धारकांना रेशन पुरवठा करण्यात बाधा निर्माण होतात. तालुका व जिल्हा मुख्यालयाशी नागरिकांचा संपर्क तुटतो. त्यामुळे नागरिकांना कधी कधी आठवडाभर गावातच राहावे लागते. 

काही लोकांना सुरक्षित स्थळी हलविले जाते. हा धोका ओळखून ग्रामीण भागात पावसाळ्यातील तीन महिन्यांचे रेशन जून महिन्यातच पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार तालुक्यात धान्य पोहोचविण्याचे काम सुरूही झालेले आहे. अशात मात्र माळेगाव गावांतर्गत येणाऱ्या रेशन दुकानदाराकडून रेशनधारकांना एका कार्डामागे एक किलो प्रति महिना कट अशाप्रमाणे तीन महिन्यांचे तीन किलो धान्य कट करून वितरित केले जात असल्याने गावातील रेशनधारकांत मोठा रोष व्यक्त केला जात आहे. शासनाने तसे आदेश दिले आहेत का? आणि जर ते असतील तर ते लेखी स्वरूपात आहेत का? नसतील तर रेशन विक्रेता कोणत्या अधिकाराने हा कट लावून कमी धान्य कार्डधारकांना देत आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

"ज्याच्या कार्डावर जेवढं रेशन ऑनलाईन आहे तेवढे रेशन विक्रेता दुकानदाराला वितरित करण्यात आले आहे. तेवढेच त्यांना द्यायचे आहे. यात एक किलो कमी वगैरे असा कुठेही सांगण्यात आलेले नाही. रेशन कमी देण्याचा प्रकार कुठे होत असेल तर तहसीलदारांकडे लेखी तक्रार करावी."- मोनिका गजभिये, पुरवठा निरीक्षक, काटोल

"सध्या गावांमध्ये रेशन कार्डवर तीन महिन्यांचे वाटप सुरू आहे. काल माझी आई प्रभाबाई विनायक रेवस्कर ही रेशन घेण्याकरिता दुकानात गेली असता तिला तीन महिन्यांचे तीन किलो याप्रमाणे रेशन कमी देण्यात आले. विचारणा केली असता आम्हाला समोरूनच रेशन कमी आल्याचे विक्रेत्याने सांगितले."- सचिन रेवस्कर, माळेगाव, ता. काटोल

टॅग्स :nagpurनागपूर