शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

औषध विक्रेत्यांच्या संपाने वैद्यकीय सेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 21:52 IST

आॅनलाईन फार्मसीविरोधात ‘आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट्स’ या संघटनेतर्फे गुरुवारी रात्री १२ वाजतापासून एक दिवसीय संप पुकारल्याने रुग्णसेवेला मोठा फटका बसला. तीन हजारांवर औषधांची दुकाने बंद ठेवण्यात आल्याने रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाईकांवर औषधांसाठी धावाधाव करण्याची वेळ आली. सर्वात जास्त फटका बसला तो आकस्मिक रुग्णांना. विशेष म्हणजे, मेयो, मेडिकल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा असल्याने व परिसरातील दुकाने बंद असल्याने अनेकांना गांधीबाग येथील संघटनेच्या कार्यालयात धाव घ्यावी लागली.

ठळक मुद्दे‘नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’ने दिले धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅनलाईन फार्मसीविरोधात ‘आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट्स’ या संघटनेतर्फे गुरुवारी रात्री १२ वाजतापासून एक दिवसीय संप पुकारल्याने रुग्णसेवेला मोठा फटका बसला. तीन हजारांवर औषधांची दुकाने बंद ठेवण्यात आल्याने रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाईकांवर औषधांसाठी धावाधाव करण्याची वेळ आली. सर्वात जास्त फटका बसला तो आकस्मिक रुग्णांना. विशेष म्हणजे, मेयो, मेडिकल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा असल्याने व परिसरातील दुकाने बंद असल्याने अनेकांना गांधीबाग येथील संघटनेच्या कार्यालयात धाव घ्यावी लागली.‘आॅनलाईन व ई फार्मसी’मधून मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या, नार्कोटिक्स ड्रग्ज, कोडीन सिरप, आणि गर्भपाताची औषधे सहज विकत घेतली जाऊ शकतात. या माध्यमातून औषधांचा दुरुपयोग होण्याची जास्त शक्यता असल्याचे कारण समोर करीत याला विरोध म्हणून ‘आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट्स’ संघटनेच्या आवाहनावरून ‘नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’ने गुरुवारी संपाची हाक दिली. संघटनेच्या फार्मसी कौन्सिलचे कार्यकारिणी सदस्य हरीश गणेशानी यांनी ‘लोकमत’ला सांगितले, १०० टक्के बंद यशस्वी राहिला. जिल्ह्यातील ३१०० औषधांची दुकाने बंद होती, असा दावाही त्यांनी केला. हा संप रुग्णांना वेठीस धरण्यासाठी नव्हता तर जनतेचे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी होता. म्हणूनच असोसिएशनतर्फे गांधीबाग येथील औषधे बाजारात ‘इमरजन्सी’ रुग्णांसाठी औषधे उपलब्ध करून देण्यात आली होती, असेही ते म्हणाले.दरम्यान सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत संविधान चौकात ‘नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’च्या पदाधिकाऱ्यांनी,औषध विक्रेत्यांनी काळे टी शर्ट घालून धरणे-आंदोलन केले. दुपारनंतर संघटनेचे शिष्टमंडळ निवासी उपजिल्हाधिकाºयांना भेटून मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी शिष्टमंडळात असोसिएशनचे उपाध्यक्ष मुकुंद दुबे, हरीश गणेशानी, नागपूर जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कावडकर, सचिव हेतल ठक्कर यांच्यासह पारस मेहता, वीरभान केवलरामानी, शैलेश गहलोद, संजय खोब्रागडे, धनंजय जोशी, विकास ओबेरॉय, हिमांशु पांडे आदींचा सहभाग होता. गुरुवारी रात्री १२ वाजतापासून बहुतांश औषधांची दुकाने बंद असल्याने शहरासह ग्रामीण भागातील रुग्णसेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली होती.मंगळवारी मेयो, मेडिकल प्रशासन संपाची माहिती नसल्यासारखेच वागले. या दोन्ही रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना सुमारे ६० टक्के औषधे बाहेरून खरेदी करावी लागतात, हे वास्तव आहे. असे असताना या रुग्णालयांनी संपाला गंभीरतेने घेतले नाही. नेहमीसारखे निवासी व वरिष्ठ डॉक्टर बाहेरून औषधे खरेदीसाठी चिठ्ठ्या लिहून देताना दिसून आले. यामुळे नातेवाईकांवर ऐनवेळी धावपळ करण्याची वेळ आल्याने अनेकांचे हाल झालेत.औषधे न मिळाल्याच्या तक्रारी नाहीतअन्न व औषध प्रशासनाने केलेल्या आवाहनामुळे शहरात शंभरावर औषध विक्रेत्यांची दुकाने सुरू होती. शिवाय ज्यांना औषधे मिळाली नाही त्यांच्या सेवेसाठी अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर देण्यात आले होते, परंतु एकाही अधिकाऱ्यांना या संदर्भात फोन आलेला नाही.राकेश तिरपुडेसहआयुक्त, औषध प्रशासन

 

 

टॅग्स :medicinesऔषधंagitationआंदोलन