शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 21:57 IST

वीज बिलापोटी ग्राहकांकडील असलेली थकबाकी पूर्णत: वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ मोहीम आक्रमकतेने राबविण्याचे स्पष्ट निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले.

ठळक मुद्देपरिमंडळ आढावा बैठक : भालचंद्र खंडाईत यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज बिलापोटी ग्राहकांकडील असलेली थकबाकी पूर्णत: वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ मोहीम आक्रमकतेने राबविण्याचे स्पष्ट निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले. विद्युत भवनातील महावितरणच्या मुख्यालयात आयोजित नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती आणि अकोला या पाचही परिमंडळाच्या आढावा बैठकीप्रसंगी त्यांनी हे निर्देश दिले.घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांसोबतच सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिवे यांच्यावर वीज बिलापोटी असलेल्या चालू आर्थिक वर्षातील संपूर्ण थकबाकीसोबतच मागील आर्थिक वर्षातील थकबाकी वसूल करा, थकबाकी भरण्यास नकार देणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करा, प्रत्येक लाईनस्टाफला थकबाकी वसुली आणि वीजपुरवठा खंडित करण्याचे दैंनंदिन लक्ष्य द्या, थकबाकी वसुली अथवा वीजपुरवठा खंडित असे दोनच पर्याय ग्राहकापुढे ठेवा, थकबाकी वसुलीत हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासोबतच काम करण्याशिवाय पर्याय नसल्याचा संदेश सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. प्रत्येक कार्यकारी अभियंत्यांनी थकबाकी वसुलीसाठी रितसर योजना तयार करा. सोबतच वीजप्रवाहामुळे जंगली प्राण्यांचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही केल्या.या बैठकीला नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता रफीक शेख, चंद्रपूर परिमंडळाचे दिलीप घुगल, अकोला परिमंडळाचे अरविंद भादीकर, मुख्य अभियंता गुणवत्ता नियंत्रण सुहास रंगारी, गोंदिया परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता लीलाधर बोरीकर, अमरावती परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता सुहास मेत्रे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार यांचेसह परिक्षेत्रांतर्गत असलेले अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, लेखा अधिकारी उपस्थित होते.डॅशबोर्डच्या आधारे पेपरलेस बैठकआजची ही बैठक केवळ डॅशबोर्डवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर झाल्याने पेपरलेस महावितरणची प्रभावी वाटचाल सुरू झाली आहे. ही बैठक डॅशबोर्ड वर आधारित होणार असल्याची पूर्वकल्पना सर्व संबंधितांना देण्यात आल्याने कुठलाही कागद, नोंदी, अहवाल, फाईल्स आदीचा पसारा न मांडता प्रत्येकाने डॅशबोर्डवरील संबंधित माहिती अत्यंत उत्साहीपणे मांडली. महावितरणच्या प्रत्येक अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांला डॅशबोर्डचा वापर प्रभावीपणे करता यावा यासाठी यापुढील प्रत्येक बैठका डॅशबोर्डवरील माहितीच्या आधारावरच घेण्यात येतील असे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सांगितले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर