शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

आमदार आणि पोलिसांत वाद; नागपूरच्या तहसील ठाण्यात वातावरण गरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 23:23 IST

गंभीर गुन्ह्यात निरपराध तरुणाला गोवण्याच्या मुद्यावरून भाजपा आमदार कृष्णा खोपडे आणि तहसील ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्यात मंगळवारी रात्री वाद झाला.

ठळक मुद्दे ठाणेदारांच्या भूमिकेमुळे प्रकरण शांत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गंभीर गुन्ह्यात निरपराध तरुणाला गोवण्याच्या मुद्यावरून भाजपा आमदार कृष्णा खोपडे आणि तहसील ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्यात मंगळवारी रात्री वाद झाला. आधी चौकशी करा नंतरच कुणाला अटक करा, अशी मागणी आ. खोपडे यांनी लावून धरली. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून ठाणेदारांनी प्रकरणाचा चौकशी अधिकारी बदलण्याची भूमिका घेतल्याने वातावरण शांत झाले. दरम्यान, या प्रकारामुळे तहसील ठाण्यातील वातावरण गरम झाले होते.

संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी हातठेलेवाल्यांसोबत काही तरुणांचा वाद झाला. यावेळी दोन गटात जबर हाणामारी झाल्याने एक जण गंभीर जखमी झाला. जखमी हातठेलेवाल्याच्या तक्रारीवरून तहसीलचे सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांच्याकडे या प्रकरणाचा तपास होता. त्यांनी सहा आरोपींना यात अटक केली. आज आकरे नामक तरुणासह आणखी काही जणांना पोलिसांनी या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तेथे नगरसेवक बाल्या बोरकर पोहचले. बोरकर यांच्यासोबत एपीआय पाटील यांचा वाद झाला. बोरकर यांनी ही माहिती देऊन आ. खोपडे यांना बोलवून घेतले. रात्री ७ च्या सुमारास खोपडे ठाण्यात पोहचले. मात्र, तोपर्यंत भाजपाचे अनेक कार्यकर्ते ठाण्याच्या परिसरात जमले होते.खोपडे यांनी यासंबंधाने एपीआय पाटील तसेच द्वितीय निरीक्षक सागर यांना निरपराध तरुणांना ३०७ सारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी कसे काय करू शकता, अशी विचारणा केली. यावरून गरमागरमी झाली. हाणामारी झाली तेव्हा तेथे हे (आज ठाण्यात आणलेले) तरुण होते, असे पोलीस म्हणाले. तर, भांडण झाल्यानंतर बघायला ५० जण येतात, तुम्ही काय ५० जणांना आरोपी करणार काय, असा प्रश्न आ. खोपडेंनी विचारला. दोन्ही गटावर गुन्हा दाखल करण्याऐवजी ठेलेवाल्यांकडून हप्ते मिळत असल्यामुळे संबंधित पोलीस अधिकारी एकतर्फी कारवाई करीत असल्याचा आरोप केला. या प्रकरणात चौकशी न करता ठेलेवाला सांगेल, त्याला पोलीस आरोपी बनवीत असल्याचेही खोपडे म्हणाले. आधी चौकशी करा, नंतरच कुणाला आरोपी करा, अशी मागणी आ. खोपडेंनी केली. ही गरमागरमी सुरू असताना ठाणेदार अरुण मालवीय तेथे पोहचले. त्यांनी आ. खोपडेंना शांत करीत चौकशी अधिकाऱ्यावर काही शंका असेल तर दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडून चौकशी करू, असे म्हणत प्रकरण शांत केले. त्यानंतर आ. खोपडे आणि भाजपा कार्यकर्ते ठाण्यातून निघून गेले. यासंबंधाने बोलताना ठाणेदार मालवीय म्हणाले की, गैरसमजातून ही गरमागरमी झाली. माझ्याशी संपर्क केला असता तर हा प्रकारच घडला नसता, असे ते लोकमतशी बोलताना म्हणाले. 

५० हजार आणि मोबाईल घेतला प्रकरण कमालीचे तापले असताना ठाण्यात असलेल्या आकरे नामक तरुणाने खोपडे यांच्याजवळ येऊन माझ्याकडून पोलिसांनी कारवाईचा धाक दाखवून ५० हजार रुपये आणि मोबाईल घेतल्याचे सांगितले. परिणामी आगीत तेल पडल्यासारखे झाले. तोच तरुण काही वेळेनंतर आला अन् आपली रक्कम तसेच मोबाईल परत केल्याचेही त्याने सांगितले. 

दोषी असेल तरच कारवाई : उपायुक्त माकणीकर पोलिसांचा कुणी शत्रू नसतो. कुणावर हेतुपुरस्सर कारवाई करण्याचा प्रश्नच नाही. फिर्यादी, आरोपींच्या बयानातूनच आरोपीचे नाव निष्पन्न केले जाते. याशिवाय कॉल डिटेल्स आणि अन्य पुरावेही लक्षात घेतले जातात. जर कुणी दोषी नसेल तर त्याला पोलीस नंतर डिस्चार्जही (दोषमुक्त) करतात. त्यामुळे कुणी दोषी नसेल तर घाबरण्याचे कारण नाही, असे यासंबंधाने पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Krushna Khopdeकृष्णा खोपडेPolice Stationपोलीस ठाणे