शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला काळिमा! प्रियकराचा प्रेयसीवर तर आजोबाचा नातीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 21:59 IST

Nagpur News एका प्रियकराने १२ वर्षांच्या प्रेयसीवर आणि कपिलनगर ठाण्याच्या परिसरात ६२ वर्षाच्या आजोबानेच आपल्या नातीलाच वासनेची शिकार बनविल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

ठळक मुद्देजरीपटका, कपिलनगर ठाण्यांतर्गत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

नागपूर : शहरात जरीपटका परिसरात एका प्रियकराने १२ वर्षांच्या प्रेयसीवर आणि कपिलनगर ठाण्याच्या परिसरात ६२ वर्षाच्या आजोबानेच आपल्या नातीलाच वासनेची शिकार बनविल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत जरीपटका परिसरात आरोपी मनीष नरेश लिंबाडे (२४) याची त्याच्याच वस्तीत राहणाऱ्या १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत मैत्री होती. दोघेही व्हॉट्सॲपवर चॅटिंग करीत होते. आरोपी मनीष एका शासकीय कार्यालयात कंत्राटी कर्मचारी आहे. अल्पवयीनने दिलेल्या तक्रारीनुसार २४ एप्रिलला रात्री १२ वाजता मनीषने तिला आपल्या घरी बोलावले होते. ती त्याच्या घरी गेल्यानंतर मनीषने तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर कुणाला काही सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. परंतु रविवारी अल्पवयीन मुलीने आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती आपल्या आई-वडिलांना आणि आजीला दिली. त्यानंतर कुटुंबीय अल्पवयीन मुलीला घेऊन जरीपटका ठाण्यात पोहोचले. जरीपटका पोलिसांनी आरोपी मनीषविरुद्ध कलम ३७६ आणि पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून सोमवारी पहाटे ३ वाजता त्याला अटक केली.

दुसऱ्या घटनेत कपिलनगर ठाण्यांतर्गत आजोबाच आपल्या १३ वर्षांच्या नातीसोबत शारीरिक संबंध करीत असल्याचे उघडकीस आले आहे. पीडित मुलीची आई गर्भवती असल्यामुळे आपल्या वडिलांच्या घरी एप्रिल २०२१ मध्ये प्रसूतीसाठी आली होती. गर्भवती असल्यामुळे तिची आई आपल्या मुलीला आजोबांजवळ झोपण्यासाठी पाठवीत होती. काही दिवसापूर्वी आईने मुलीला वडिलांसोबत आपत्तीजनक स्थितीत पाहिले. त्यानंतर तिने मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली. अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर तिच्या आईने कुटुंबीयांशी चर्चा केली. परंतु त्यांनी बदनामीच्या भीतीने शांत राहण्याचा सल्ला देऊन चुप्पी साधली. परंतु पीडित मुलीच्या आईने हिंमत दाखवून कपिलनगर ठाण्याचे निरीक्षक अमोल देशमुख यांना घटनेची माहिती दिली. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार व पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

युवतीला पळवून नेण्याची धमकी

यशोधरानगर ठाण्यांतर्गत राहत असलेल्या १८ वर्षाच्या युवतीला पळवून नेण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत पोलिसांनी आरोपीचे नाव उघड केलेले नाही. पहिला फोन युवतीला ३१ मे मंगळवारी सायंकाळी ६ वाजता आला होता. त्यानंतर तिच्या मामाने फोन उचलला असता, आरोपीने त्यांच्या भाचीला पळवून नेण्याची धमकी दिली. तुम्ही आमच्या मध्ये पडू नका, असे सांगून आरोपीने आपला फोन बंद केला. मुलीच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध छेडखानी व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

...............

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी