शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
2
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
3
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
4
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
5
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
6
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
7
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
8
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
9
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
10
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
11
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
12
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
13
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
14
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
15
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
16
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
17
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
18
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
19
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
20
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा

२६ फेब्रुवारीपासून नागपुरात होणार ब्रह्मांडावर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 22:49 IST

‘सिरी’ (सेंट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट) व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने खगोलशास्त्रासंदर्भात आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होणाऱ्या या संमेलनाला देशविदेशातील नामांकित शास्त्रज्ञ व संशोधक उपस्थित राहणार आहेत.

ठळक मुद्देखगोलशास्त्र संमेलनाचे आयोजन : देशविदेशातील संशोधक उलगडणार भौतिक विश्वाचे अंतरंग

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘सिरी’ (सेंट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट) व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने खगोलशास्त्रासंदर्भात आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होणाऱ्या या संमेलनाला देशविदेशातील नामांकित शास्त्रज्ञ व संशोधक उपस्थित राहणार आहेत. यात डॉ.जयंत नारळीकर यांचादेखील समावेश असेल, अशी माहिती ‘सिरी’चे अध्यक्ष आ.अनिल सोले यांनी दिली.२६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कल्याणकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन होईल. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात डॉ.जयंत नारळीकर हे विश्वाचे कोडे आपल्याला कितपत उलगडले आहे, या विषयावर व्याख्यान देतील.सोबतच या संमेलनात जर्मनीच्या ‘मॅक्स प्लांक’ संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. गेयुंग चॉन, डॉ. हान्स बोरिंजर व चीनच्या ‘बिजिंग आॅब्सर्वेटरी’चे डॉ जिनलिन हान हे ‘गॅलेक्सी’च्या, दीर्घिका यांच्या निरीक्षणावर प्रकाश टाकतील. पुण्याच्या ‘आयुका’ संस्थेचे संशोधक डॉ.अजित केवाभी, अमेरिकेतील ओहायो विद्यापीठाचे डॉ.समीर माथुर, पॅरिस विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ.मार्टिन बुचर, मेक्सिको येथील डॉ.ओविजिक्स, मुंबईच्या ‘टीआयएफआर’चे डॉ.उन्नीकृष्णन, जपानच्या टोकियो विद्यापीठाचे संशोधक डॉ.युटो मिनामी, दक्षिण अफ्रिकेतील क्वाझुलु-नाताळ विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ.डेविन क्रिच्टन, डॉ.सुनील महाराज, इंग्लंडच्या हर्टफोर्डशायर विद्यापीठातील डॉ.मार्टिनी क्राऊस, दिल्ली विद्यापीठातील डॉ.पैत्रिक दासगुप्ता, कोलकाताचे डॉ.नारायण बॅनर्जी, बेंगळुरु येथील भारतीय खगोल भौतिकी संस्थेतील डॉ.राम सागर, ‘इस्त्रो’च्या ‘स्पेस अप्लिकेशन सेंटर’चे डॉ.रतनसिंह बिश्त इत्यादी तज्ज्ञ या संमेलनात सहभागी होणार आहेत, असे आ.सोले यांनी सांगितले. यावेळी संयोजक डॉ.संजय वाघ, डॉ.दिलीप देशपांडे, प्रा.राजेश बागडी, अभय कोलारकर प्रामुख्याने सहभागी होते.

टॅग्स :Earthपृथ्वीscienceविज्ञान