शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
5
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
6
'नमस्कार फ्रॉम स्पेस; तुम्हीही या प्रवासाचा आनंद घ्या', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video
7
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
8
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
9
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
10
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
11
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
12
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
13
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
14
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
15
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
16
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
17
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
18
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
19
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
20
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा

उपअभियंत्याच्या कक्षात तोडफोड

By admin | Updated: June 11, 2014 01:36 IST

मोमीनपुरा भागातील नादुरुस्त सिवर लाईनवरून मंगळवारी नगरसेविकेचे पती व गांधीबाग झोनचे उपअभियंता यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. वाद वाढल्याने धक्काबुक्की करून कार्यालयात तोडफोड केल्याचा

धक्काबुक्की : एकमेकांच्या विरोधात पोलिसात तक्र ार नागपूर : मोमीनपुरा भागातील नादुरुस्त सिवर लाईनवरून मंगळवारी नगरसेविकेचे पती व गांधीबाग झोनचे उपअभियंता यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. वाद वाढल्याने धक्काबुक्की करून कार्यालयात तोडफोड केल्याचा आरोप उपअभियंता अरुण मोगलेकर यांनी केला आहे. महाल येथील गांधीबाग झोन कार्यालयात मोमीनपुरा प्रभागाच्या नगरसेविक ा अशरफू इफ्तीखार यांचे पती इफ्तीखार दुपारी १२.३० च्या सुमारास उपअभियंता मोगलेकर यांच्या कार्यालयात आले. त्यांनी सिवर लाईनच्या कामावरून जाब विचारत शिवीगाळ सुरू केली. यावरून दोघातील वाद वाढला. इफ्तीखार यांनी धक्काबुक्की करून कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड केली. गोंधळामुळे अधिकारी व कर्मचारी आल्याने पुढील अनर्थ टळल्याची माहिती मोगलेकर यांनी दिली.हंसापुरी प्रभागातील सिवर लाईन जुनी झाली आहे. दुरुस्तीसाठी कंत्राटदार मिळत नसल्याने काम रखडले आहे. यामुळे या भागातील नागरिक त्रस्त आहेत. परंतु सामोपचाराने यावर तोडगा न काढता मारहाण व तोडफोड करण्याचा प्रयत्न योग्य नाही. इफ्तीखार यांच्याविरोधात कोतवाली पोलिसात तक्र ार दाखल केल्याची माहिती मोगलेकर यांनी दिली. दुसरीकडे अधिकारी धमक्या देत असल्याचा आरोप करीत इफ्तीखार यांनी मोगलेकर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. गेल्या दोन महिन्यापासून सिवर लाईन दुरुस्तीची वारंवार मागणी करीत आहे. परंतु अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे त्रस्त नागरिक नगरसेवकांना जाब विचारतात. याला अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप इफ्तीखार यांनी केला आहे. (प्रतिनिधी)