शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठा विखुरल्याने शेतकऱ्यांना भाज्या विकताना होतोय आर्थिक तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 10:16 IST

विहीरगाव येथील उत्पादक शेतकरी केशव आंबटकर म्हणाले, कळमन्यात एक दिवसाआड भाज्या विक्रीसाठी नेत होतो. पण ग्राहकांच्या गर्दीमुळे बाजार बंद झाला आणि आम्हाला फटका बसला.

ठळक मुद्दे लॉकडाऊननंतर स्थिती सुधारणार यंदा भाज्यांची जास्त आवक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजीपाला खरेदी करताना ग्राहकांनी अनावश्यक गर्दी केल्याने जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी कॉटन मार्केट आणि कळमना भाजी बाजाराला शहराच्या विविध भागात विभागले. त्यानुसार शहरातील बाजारांमध्ये व्यापारी आणि अडतिया व्यवसाय करीत आहेत. पण या विखुरलेल्या बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करून भाज्यांची विक्री करावी लागत आहे.विहीरगाव येथील उत्पादक शेतकरी केशव आंबटकर म्हणाले, कळमन्यात एक दिवसाआड भाज्या विक्रीसाठी नेत होतो. पण ग्राहकांच्या गर्दीमुळे बाजार बंद झाला आणि आम्हाला फटका बसला. वाहतुकीचा खर्च वाढला आहे. ठरलेल्या अडतियाकडे माल विक्रीसाठी नेताना दिवसभर मालाच्या विक्रीसाठी वाट पाहावी लागते. एवढेच नव्हे तर माल जागेवर खाली करण्याचे आदेश असतानाही अडतिया माल खाली करीत नाही, शिवाय मालाचे पैसेही वेळेत मिळत नाही.यंदा पावसाने मध्यंतरी हजेरी लावल्याने भाज्यांचे जास्त उत्पादन झाले. सर्वांच्या शेतात जास्त माल आहे. दररोज कापणी करून विकला नाही तर शेतातच खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे बाजारात कमी प्रमाणात माल नेत आहे. घरी परतीच्या घाईने माल विकून मोकळे व्हावे लागत आहे. बाजारात नेणारा माल चांगल्या किमतीत विकला जावा, या अपेक्षेने बाजारात जातो. पण सध्या सर्व शेतकऱ्यांकडून मालाची आवक वाढल्याने किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे नेहमीपेक्षा कमी पैसे घेऊन घरी परतावे लागत असल्याचे आंबटकर यांनी सांगितले.कॉटन मार्केटच्या अडतियांनी सांगितले की, येथील ३९ अडतिया आता आठ बाजारात व्यवसाय करीत आहेत. एका अडतियाला शेतकऱ्यांचा दोनच गाड्यांमधील भाजीपाला विकण्याची परवानगी आहे, शिवाय गाड्यांमधील भाज्या रिक्त करून भाज्या विकाव्या लागतात. अटी आणि नियमांचे पालन न केल्यास दंड भरावा लागतो. याकरिता शेतकरी तोडणी केलेला पूर्ण भाजीपाला बाजारात आणत नाहीत. कोरोनामुळे सर्वच आर्थिक गणित बिघडले आहे. अडतियांसोबत शेतकऱ्यांनाही आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. लॉकडाऊननंतर स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. कळमना आणि कॉटन मार्केट या मुख्य बाजारात पूर्ण क्षमतेने भाज्या विक्रीसाठी आल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस