शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

विकारग्रस्त नागरिकांची होणार ‘ऑक्सिजन लेव्हल’ चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 22:48 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि नागपूर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विशेषत: मधुमेह, रक्तदाब आदी विकाराने ग्रस्त ज्येष्ठ नागरिकांचे व ज्यांना मधुमेह, उच्चरक्तदाब सारखे आजार आहेत त्यांच्या ‘ऑक्सिजन लेव्हल’ची चाचणी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशुक्रवारपासून मोहीम : मनपा, जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि नागपूर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विशेषत: मधुमेह, रक्तदाब आदी विकाराने ग्रस्त ज्येष्ठ नागरिकांचे व ज्यांना मधुमेह, उच्चरक्तदाब सारखे आजार आहेत त्यांच्या ‘ऑक्सिजन लेव्हल’ची चाचणी करण्यात येणार आहे. नागपुरातील सर्व २८ पोलीस ठाण्यांमधून शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता नगरसेवक आणि पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. या कार्यात विविध स्वयंसेवी संस्थाही सहभागी होणार आहेत.विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ.भूषण कुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्या संयुक्त बैठकीत गुरुवारी याबाबत निर्णय घेण्यात आला. नागपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. मृत्यूसंख्यासुद्धा झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि रुग्णांची प्रकृती बिघडते. म्हणून रुग्णांच्या ऑक्सिजन पातळीची तपासणी करण्यात येणार आहे. मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस कर्मचारी या मोहिमेत भाग घेणार आहेत. मनपा कर्मचारी व एन.जी.ओ.चे प्रतिनिधी पोलिसांसोबत नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करणार आहेत. ऑक्सिजन लेव्हलची तपासणी करुन नागरिकांची प्राणहानी थांबवण्यात यश येऊ शकते. शुक्रवारपासून ही मोहीम संपूर्ण शहरात राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपक्रमात सहभागी होऊन कोरोनाला हद्दपार करण्यात प्रशासनाला मदत करावी. नगरसेवकांनी आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर