शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कोरोना क्वारंटाईन सेंटर्समध्ये दिव्यांग कायद्याची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 09:38 IST

नागपूर शहरात ३५ क्वारंटाईन सेंटर्स असून प्रत्येक ठिकाणची परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात सारखीच आहे. या सेंटर्समध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत.

उदय अंधारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिकेद्वारे कोरोना रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटर्समध्ये दिव्यांग कायद्यांची पायमल्ली होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शहरात ३५ क्वारंटाईन सेंटर्स असून प्रत्येक ठिकाणची परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात सारखीच आहे. या सेंटर्समध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत.दिव्यांग कायद्यानुसार प्रत्येक सार्वजनिक इमारतीमध्ये रॅम्प, हॅण्डरेल्स, व्हीलचेअर्स, विशेष स्वच्छतागृहे इत्यादी सुविधा असणे आवश्यक आहे. परंतु, शहरातील क्वारंटाईन सेंटर्समध्ये या सुविधांचा अभाव आहे. आमदार निवासाच्या देखभालीची जबाबदारी असलेले अभियंता राऊ डकर यांनी त्यांना यासंदर्भात निर्देश मिळाले नसल्याची माहिती दिली. मनपाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, प्रत्येक झोन कार्यालयासाठी ४० व्हीलचेअर्स खरेदी करण्यात आल्या आहेत. परंतु, त्या व्हीलचेअर्स दिव्यांगांना उपलब्ध करून देण्यात येत नाहीत. एवढेच नाही तर, दिव्यांगांना साधारण रुग्णवाहिकांमधून रुग्णालयांत व क्वारंटाईन सेंटर्समध्ये नेले जात आहे. त्याचा दिव्यांगांना प्रचंड त्रास होत आहे. व्हीलचेअरसह आत जाता येईल अशा ४ कार व १ बस नागपूरमधील अशासकीय संस्थांकडे उपलब्ध आहे. परंतु, त्यांचा उपयोग केला जात नाही. याविषयी माहिती घेण्यासाठी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई यांना फोन कॉल केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.दिव्यांगांवर अन्यायशहरात सुमारे ८००० दिव्यांग व्यक्ती आहेत. त्यामुळे कोरोना क्वारंटाईन सेंटर्समध्ये दिव्यांग कायद्याची पायमल्ली होणे अतिशय गंभीर बाब आहे. हा दिव्यांगांवर अन्याय आहे. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे असे दिव्यांगांच्या अधिकारासाठी लढणारे सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटचे माजी संचालक पिलानी अंधारे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDivyangदिव्यांग