शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर बसस्थानकाचे विश्रामगृह की गलिच्छ उकिरडा?; चालक-वाहक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 11:15 IST

गणेशपेठ बसस्थानकाच्या विश्रांतीगृहात विदर्भासह महाराष्ट्रातून चालक-वाहक मुक्कामी असतात. परंतु डासांच्या उपद्रवामुळे त्यांना झोप लागत नाही. येथे दुर्गंधी पसरल्यामुळे त्यांना नाकाला रुमाल बांधून कसेबसे झोपावे लागते.

ठळक मुद्देअर्धवट झोपेमुळे अपघाताची शक्यता दुर्गंधीचे साम्राज्य, समस्या सोडविणार कोण?

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशपेठ बसस्थानकाच्या विश्रांतीगृहात विदर्भासह महाराष्ट्रातून चालक-वाहक मुक्कामी असतात. परंतु डासांच्या उपद्रवामुळे त्यांना झोप लागत नाही. येथे दुर्गंधी पसरल्यामुळे त्यांना नाकाला रुमाल बांधून कसेबसे झोपावे लागते. प्रसाधनगृहात दरवाजा नाही, बेसिन चोक झाल्यामुळे पाणी साचलेले, अशा एक ना अनेक समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो. रात्री झोप झालेली नसताना दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून चालकाला स्टेअरिंगवर बसावे लागते. त्यामुळे विश्रांतीगृहातील समस्या कधी दूर होणार, असा प्रश्न येथील चालक-वाहकांनी उपस्थित केला.नागपुरातील गणेशपेठ बसस्थानकावरील विश्रांतीगृहातील सोईसुविधांचा ‘लोकमत’ने आढावा घेतला असता येथे उपस्थित चालक-वाहकांनी समस्यांचा पाढाच वाचला. येथे गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विश्रांतीगृहात पूर्वी चालक-वाहकांसाठी पलंग, गाद्या राहत. परंतु अलीकडील काळात एसटी महामंडळाने साधी सतरंजी टाकलेली दिसली नाही. कर्मचारी घरून आणलेली चादर टाकून त्यावर विश्रांती घेतात. विश्रामगृहाला लागूनच बाथरुम, शौचालय आहे. येथे नियमित सफाई होत नसल्यामुळे कमालीची दुर्गंधी पसरलेली दिसली. बाथरुमचे दारही नादुरुस्त असल्यामुळे ते उघडेच ठेवून अंघोळ करावी लागते. दुर्गंधीमुळे रात्रभर कर्मचाऱ्यांना डासांचा त्रास होतो. विश्रांतीगृहाच्या कोपऱ्यात कचरा साठलेला दिसला. बेसिन चोक झाल्यामुळे त्यात पाणी तुडुंब भरलेले होते. वॉटर कुलरजवळही कमालीची घाण पसरल्यामुळे तेथे पाणी पिण्याचे सोडा हात धुण्याचीही इच्छा होत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. अनेक कर्मचारी ड्युटीवर निघताना आपल्या घरून दोन-तीन पाण्याच्या बॉटल घेऊन येतात. शौचालयात पाण्याचा पाईप फुटल्यामुळे पाणी अंगावर पडते. अशा परिस्थितीत येथे रात्र काढण्याची पाळी चालक-वाहकांवर येत आहे. नाईलाजास्तव रात्रभर येथे थांबून चालक-वाहक दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून बस घेऊन जातात. त्यामुळे विश्रांतीगृहातील समस्या दूर करून तेथे सोईसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी चालक-वाहकांनी केली.विश्रांतीगृहात चोरीच्या घटनारात्री मुक्कामी बस घेऊन आल्यानंतर वाहकांजवळ दिवसभरात प्रवाशांकडून आलेली रक्कम राहते. परंतु येथे सुरक्षेची कोणतीच सुविधा नसल्यामुळे अनेकदा येथे चोरीच्या घटना घडत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. पूूर्वी एसटीच्या प्रशासनातर्फे येथे आलेल्या चालक-वाहकांची नोंद करण्यासाठी एक कर्मचारी नियुक्त करण्यात येत होता. परंतु तो कर्मचारीही आता दिसत नसल्यामुळे कुणीही येऊन येथे विश्रांती करीत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ