शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षातील थेट प्रवेश हायकोर्टाच्या निर्णयाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:53 IST

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील थेट प्रवेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित याचिकेवरील निर्णयाधीन राहतील असे सोमवारी स्पष्ट करण्यात आले. तसेच, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात यावी असे सरकारला सांगण्यात आले.

ठळक मुद्देआर्थिक दुर्बलांना आरक्षण नाही : सरकारला मागितली जागांची माहिती

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील थेट प्रवेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित याचिकेवरील निर्णयाधीन राहतील असे सोमवारी स्पष्ट करण्यात आले. तसेच, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात यावी असे सरकारला सांगण्यात आले.अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश देण्यासाठी राखिव असलेल्या जागांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्यात आले नाही. त्यामुळे उत्कर्षा देशमुख या विद्यार्थिनीने रिट याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने वरील बाब स्पष्ट केली. तसेच, राज्यभरात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षात एकूण किती जागा उपलब्ध आहेत याची माहिती एक आठवड्यात सादर करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. या परिस्थितीत राज्य सरकारला अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश देता येतील. परंतु, ते प्रवेश तात्पुरते राहतील. न्यायालयाने याचिका मंजूर केल्यास सर्व प्रवेश रद्द करावे लागतील आणि याचिका खारीज झाल्यास सर्व प्रवेश कायम होतील.सरकारने केला भेदभावअभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश देण्याकरिता निश्चित करण्यात आलेल्या जागांमध्ये आर्थिक दुर्बल घटक वगळता इतर सर्वांना आरक्षण लागू करण्यात आले आहे. ही कृती भेदभावपूर्ण आहे. त्यामुळे राज्यघटनेतील चौदाव्या अनुच्छेदाचे उल्लंघन झाले आहे असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. आर. व्ही. गहिलोत यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयStudentविद्यार्थी