शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट जळीत पीडितेला कृत्रिम नळीद्वारे जेवण : उपचाराचा पाचवा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 20:27 IST

Hinganghat Case : हिंगणघाट जळीत पीडितेला शुक्रवारी कृत्रिम नळीद्वारे जेवण देण्यात आले. प्रकृतीत किंचित सुधारणा होत असली तरी धोक्याबाहेर नसल्याची माहिती, ऑरेंज सिटी हॉस्पिटलचे जळीत तज्ज्ञ व प्लास्टिक सर्जन डॉ. दर्शन रेवनवार व क्रिटीकल केअर तज्ज्ञ डॉ. राजेश अटल यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देअजूनही धोक्याबाहेर नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : हिंगणघाट जळीत पीडितेला शुक्रवारी कृत्रिम नळीद्वारे जेवण देण्यात आले. प्रकृतीत किंचित सुधारणा होत असली तरी धोक्याबाहेर नसल्याची माहिती, ऑरेंज सिटी हॉस्पिटलचे जळीत तज्ज्ञ व प्लास्टिक सर्जन डॉ. दर्शन रेवनवार व क्रिटीकल केअर तज्ज्ञ डॉ. राजेश अटल यांनी पत्रपरिषदेत दिली.डॉ. अटल म्हणाले, आज पीडितेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. गुरुवारी तिचा रक्तदाब वाढला होता. यामुळे औषधे बदलविण्यात आली. कालच्या तुलनेत आज रक्तदाब सामान्य आहे. परंतु हा रक्तदाब औषधाने कमी झालेला आहे. स्वत:हून नाही. कमी जास्त रक्तदाबामुळे लघवीवर परिणाम होतो. ही संसर्ग होत असल्याची लक्षणे आहे. यामुळे यात आम्ही किती यशस्वी होऊ हे आतातरी सांगणे कठीण आहे. पीडितेचे नव्याने ड्रेसिंग करण्यात आले. शरीरात जंतूसंसर्ग कुठला आहे, याच्या चाचण्या केल्या जातील. सध्यातरी पीडितेला व्हेंटिलेटरची गरज पडली नाही. औषधांना दाद देत आहे. ती शुद्धीवर आहे. परंतु अद्यापही गंभीर आहे. डॉ. रेवनवार म्हणाले, जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून तिच्या कक्षातील खाटा रिकाम्या ठेवण्यात आल्या आहेत. तिच्या कक्षात केवळ उपचारासाठी डॉक्टर व परिचारिकांनाच जाण्याची परवानगी आहे. निवडक लोकांना काचेतून पाहण्याची व्यवस्था केली आहे. 

केंद्राकडून मदतीची मागणी केली-खा. तडसवर्धा जिल्ह्याचे खा. रामदास तडस यांनी शुक्रवारी नागपुरातील ऑ रेंज सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन पीडित तरुणीच्या प्रकृतीची चौकशी केली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, हिंगणघाटमधील घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. लोकसभेत शून्यकाळात सर्व खासदारांनी या घटनेवर आपले विचार मांडले. अशा घटना घडूच नये. कायद्याचा धाक असावा म्हणून कडक नियम तयार करायला हवे. वेळ पडली तर या विषयावर एक दिवसाचे अधिवेशन व्हायला हवे. त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हायला हवी, अशी मागणीही आहे. या घटनेचे पडसाद जसे महाराष्ट्रात तसे संसदेतही उमटले आहे. पीडितेला केंद्राकडून मदत व्हावी म्हणून भारताचे गृहमंत्री अमित शाह व केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना विनंती केली आहे. महाराष्ट्र सरकारनेही पीडितेला मदत द्यावी, असेही ते म्हणाले.

टॅग्स :HinganghatहिंगणघाटCrime Newsगुन्हेगारी