शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमी सज्ज : गुरुवारी मुख्य सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:06 IST

६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी पूर्ण झाली असून, देश-विदेशातून येणाऱ्या लाखो अनुयायांच्या स्वागतासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली आहे. दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळा गुरुवारी असला तरी, देशातील विविध भागातून बौद्ध अनुयायांचे येणे सुरू झाले आहे. उद्या १४ आॅक्टोबर असल्याने दीक्षाभूमीवर अनुयायांची मोठी गर्दी होईल.

ठळक मुद्देअनुयायी दाखल, आज होणार गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी पूर्ण झाली असून, देश-विदेशातून येणाऱ्या लाखो अनुयायांच्या स्वागतासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली आहे. दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळा गुरुवारी असला तरी, देशातील विविध भागातून बौद्ध अनुयायांचे येणे सुरू झाले आहे. उद्या १४ आॅक्टोबर असल्याने दीक्षाभूमीवर अनुयायांची मोठी गर्दी होईल.धम्मदीक्षा सोहळ्याबाबत अधिक माहिती देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी सांगितले की, दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा यंदा चार दिवसांचा राहणार आहे. सोमवार १५ आॅक्टोबरपासून महिला परिषदेने या सोहळ्याची सुरुवात होईल. ‘भारतीय संविधान आणि लोकशाहीपुढील आव्हाने’ या विषयावरील ही परिषद असून डॉ. कमल गवई या अध्यक्षस्थानी राहतील. रेखा खोब्रागडे उद्घाटक राहतील. १६ आॅक्टोबरपासून भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते धम्मदीक्षेच्या कार्यक्रमास सुरुवात होईल. १७ तारखेला दीक्षाभूमीवर पंचशील झेंड्यांचे ध्वजारोहण होईल. त्याच दिवशी सायंकाळी धम्म परिषद होईल. या परिषदेला जगभरातील बौद्ध भंते आणि विचारवंत सहभागी होतील. रात्री अश्वघोष आर्ट अ‍ॅण्ड कल्चर फाऊंडेशन कोल्हापूरतर्फे ‘संविधान जागर’ हा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम होईल.पत्रपरिषदेला स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सदस्य विलास गजघाटे, एन.आर. सुटे, डॉ. सुधीर फुलझेले, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.सी. पवार यांच्यासह कैलास वारके, शरद मेश्राम, गणेश तांबे, देवाजी रंगारी, मधुकर मेश्राम आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी, आठवले प्रमुख अतिथी१८ आॅक्टेबर रोजी सायंकाळी ६ वाजता दीक्षाभूमीवर मुख्य कार्यक्रम होईल. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबंधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वरा, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि महापौर नंदा जिचकार प्रमुख पाहुणे राहतील.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर