शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सन्मानजनक तोडगा तरच काँग्रेससोबत आघाडी :आनंदराज आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 20:31 IST

काँग्रेससोबत चर्चा म्हणजे नेमकी कुणाशी चर्चा ? काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे त्यांचे हायकमांड ऐकतात का हा मुख्य प्रश्न आहे. आम्ही १२ जागांची मागणी केली आहे. जागांची अदलाबदली होऊ शकते. परंतु सन्मानजनक बोलणी झाली तरच काँग्रेससोबत आघाडी होईल, अन्यथा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्यास तयार आहे, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी येथे पत्रपरिषदेत बोलताना स्पष्ट केले.

ठळक मुद्दे सर्व जागा लढण्याची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेससोबत चर्चा म्हणजे नेमकी कुणाशी चर्चा ? काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे त्यांचे हायकमांड ऐकतात का हा मुख्य प्रश्न आहे. आम्ही १२ जागांची मागणी केली आहे. जागांची अदलाबदली होऊ शकते. परंतु सन्मानजनक बोलणी झाली तरच काँग्रेससोबत आघाडी होईल, अन्यथा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्यास तयार आहे, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी येथे पत्रपरिषदेत बोलताना स्पष्ट केले.रमाई महोत्सवासाठी ते नागपुरात आले असता रविभवन येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रमेश जाधव, योगेश चवरे, गिरीष पुलझेले, नरेश वाहाणे उपस्थित होते.आनंदराज आंबेडकर म्हणाले, भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात दलित, पीडित, वंचित एकवटत आहे. शिवाय पुन्हा एकदा आंबेडकरी समाज आंबेडकर कुटुंबाच्या पाठीमागे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मोठी शक्ती निर्माण झाल्याने राज्यातील राजकारणात आमूलाग्र बदल होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. जेव्हा-जेव्हा समाज एक झाला त्याचे प्रतिनिधित्व संसदेसह विधानसभेत उमटले. येत्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी दोन अंकी आकडा नक्की गाठेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सध्या तर भयावह परिस्थिती असून अल्पसंख्याक व आंबेडकरी समाजावरील अत्याचारात वाढ झाली आहे. हिंदू राष्ट्राच्या संकल्पना मांडल्या जात असतानाच संविधानच बदलण्याची भाषा मोदी सरकारमधील मंत्री करतात. तर शहरी नक्षलवादाच्या नावावर विचारवंतांना गोळ्या घातल्या जात असून कारागृहात सुद्धा डांबले जात आहे. समाजात मोठा असंतोष आहे. आरक्षणाचा नावावर तर चेष्टा सुरू आहे. उद्या विजय माल्ल्या देशात आला तर तो सुद्धा आरक्षणाचा दावा करू शकतो, अशी टीकाही त्यांनी केली.प्रकाश आंबेडकर अकोल्यातूनच लढणारवंचित बहुजन महाआघाडीला प्रत्येक जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. लाखोच्या सभा होत आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की, त्यांच्या जिल्ह्यातून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवावी. सोलापूर येथील कार्यकर्त्यांकडूनही अशी मागणी होत आहे. परंतु, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे अकोला येथूनच निवडणूक लढणार आहेत. आपण मात्र पडद्यामागील सूत्रे हलविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेस