शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
2
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
3
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
4
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
5
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
6
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
7
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
8
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
11
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
12
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
13
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
14
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
16
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
17
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
18
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
19
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
20
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा

डिजिटलला ग्रहण

By admin | Updated: May 25, 2017 01:36 IST

राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा म्हणून शासनाने नागपूर जिल्ह्याची घोषणा केली होती.

४४९ ग्रा.पं.चे आॅनलाईन कामकाज ठप्प : थकीत बिलाचा भरणा करणार कोण?मंगेश व्यवहारे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा म्हणून शासनाने नागपूर जिल्ह्याची घोषणा केली होती. जिल्ह्यातील ७६९ ग्रामपंचायती वायफायने कनेक्ट करण्यात आल्या होत्या. या तंत्रज्ञानामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: जिल्ह्यातील डोंगरगाव, बेलदा व ब्राह्मणी येथील शेतकरी, महिला बचत गट व विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला होता. परंतु आजच्या घडीला जिल्ह्यातील ४४९ ग्रा.पं.चे वायफाय कनेक्शन बंद पडले आहे. वर्षभराच्या आतच डिजिटल जिल्ह्याचा बोजवारा उडाला आहे. राष्ट्रीय आॅप्टिकल फायबर नेटवर्क प्रकल्पांतर्गत २०१४ मध्ये नागपूरची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली होती. शहरासह १३ तालुक्यांमध्ये एकूण १६०० किमी आॅप्टिकल फायबर केबल टाकून ग्रामपंचायतींना कनेक्ट करण्यात आले होते. ३० कोटींच्या प्रकल्पामुळे ग्रामपंचायतसह प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळेसह अन्य संस्था व नागरिकांना अखंडित, दर्जेदार आणि वेगवान इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. पंचायत संस्थांचा कारभार अधिक सक्षम व गतिमान होण्यासाठी ग्रामपंचायतींना वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. ग्रामपंचायत स्तरावर संग्राम कक्षाच्या माध्यमातून २७ प्रकारचे दाखले दिले जातात. ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटीमुळे ही समस्या दूर झाली होती. लोकांना तात्काळ दाखले मिळत होते. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही यंत्रणा फार काळ टिकू शकली नाही. आजच्या घडीला जिल्ह्यातील ४४९ ग्रा.पं. चे वायफाय बंद पडले आहे. बीएसएनएलच्या माध्यमातून सेवा पुरविण्यात आली होती. परंतु या यंत्रणेचे बिल थकीत असल्याने यंत्रणा ठप्प पडली आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे असलेल्या आकडेवारीनुसार १४ एप्रिलपर्यंत ३०५ ग्रा.पं. मध्ये ही सेवा सुरू होती. या ग्रा.पं.वरसुद्धा बिल थकीत होते. त्यामुळे आज यातीलही अनेक ग्रा.पं. ची वायफाय सेवा बंद पडली आहे. प्रशासनाचे दुर्लक्षशासनाच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती, जीआर गावकऱ्यांना आॅनलाईन मिळत होते. शासनाचा हा उपक्रम अतिशय प्रभावी होता. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शासनाने केलेला करोडो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे शासनाच्या डिजिटल धोरणात खंड पडला आहे. - संदीप सरोदे, सभापती, पं.स. काटोलशासनाने थकीत बिल भरावेशासनाने करोडो रुपये खर्चून सामान्य जनतेला लाभ झाला नाही. मुळात ग्रा.पं.च्या उत्पन्नाचे स्रोत अत्यल्प असल्याने शासनानेच वायफाय यंत्रणेचे भुगतान करावे.- शरद डोणेकर, उपाध्यक्ष, जि.प.