शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रसिकांनी अनुभवल्या वेगळ्या वाटा

By admin | Updated: August 27, 2014 00:59 IST

नेहमीच्या पद्धतीने सुरू असलेल्या जीवनाला कुठेतरी अचानक ब्रेक लागतो. आपण काय करतोय व काय करायचे आहे, या प्रश्नांमुळे वैचारिक संघर्षाची ठिणगी उडते. खरा प्रयत्न असतो तो दुसऱ्या

संघर्षपूर्ण जीवन : चाकोरीबाहेर जगणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा परिचयनागपूर : नेहमीच्या पद्धतीने सुरू असलेल्या जीवनाला कुठेतरी अचानक ब्रेक लागतो. आपण काय करतोय व काय करायचे आहे, या प्रश्नांमुळे वैचारिक संघर्षाची ठिणगी उडते. खरा प्रयत्न असतो तो दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा. चाकोरीबाहेर जाऊन जीवन जगणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात असे प्रसंग आलेले असतात. यामुळेच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. अंत:करणाने सुचविल्यामुळे वेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या अशाच चार व्यक्तिमत्त्वांचे अनुभव ऐकण्याची संधी आज, मंगळवारी नागपूरकरांना मिळाली. ही चार व्यक्तिमत्त्वे स्वत:ही वेगळ्या वाटाच आहेत. या वाटा श्रोत्यांनी अनुभवल्या. समाजसेवेचे व्रत घेतलेले दाम्पत्य डॉ. दिगंत व डॉ. अनघा आमटे, प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक व गुन्हेगारी मार्ग सोडून सत्कर्माचा प्रसार करणारे लक्ष्मण गोळे अशी या व्यक्तिमत्त्वांची नावे आहेत. सप्तक संस्था व छाया दीक्षित वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायंटिफिक सोसायटी सभागृहात ‘वेगळ्या वाटा’ या शीर्षकाखाली त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गिरीश ओक व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांच्या कुटुंबाचा नाटकाशी तसुभरही संंबंध नाही. ते स्वत:ही वयाच्या १७ वर्षांपर्यंत नाटकाच्या संपर्कात आले नव्हते. वैद्यकीय पदवी मिळविल्यानंतर त्यांनी नागपुरात रुग्णालय सुरू केले होते. यानंतर त्यांना वाटायला लागले की, हे आपले काम नाही. आपल्याला काहीतरी वेगळे करायचे आहे. यामुळे ते अभिनय करायला मुंबईत गेले. अथक परिश्रम घेऊन उत्कृष्ट नाट्य व चित्रपट अभिनेते म्हणून लौकिक प्राप्त केला. ते ३० वर्षांपासून मुंबईत आहेत. परंतु अद्यापही मुंबईत रुजलो नसल्याचे सांगून नागपूर हेच आपले मूळ गाव असल्याचे मनापासून वाटते, असे ओक म्हणाले.बाबा आमटे यांची समाजसेवा सर्वांना माहीत आहे. पण त्यांच्यानंतरही हे व्रत आजतागायत टिकवून ठेवण्यात आमटे कुटुंबातील भावी पिढ्यांनी कुठलीच कमतरता ठेवलेली नाही. बाबा आमटे यांचे नातू डॉ. दिगंत यांचा या कार्यात मनोभावे सहभाग आहे. डॉ. अनघा यांनी लठ्ठ पगाराच्या संधी सोडून डॉ. दिगंत यांच्यासोबत विवाह केला व समाजसेवेसाठी स्वत:ला वाहून घेतले.डॉ. अनघा यांच्यानुसार, पुणे येथील एका मॅरेज ब्युरोमुळे ते एकमेकांच्या संपर्कात आले. यानंतर डॉ. दिगंत यांनी संघर्षपूर्ण जीवनाची माहिती देऊनही डॉ. अनघा यांनी विवाहास होकार दिला. आदिवासींची भाषा आत्मसात करणे पहिले मोठे आव्हान होते, असे त्यांनी सांगितले. डॉ. दिगंत यांनी आदिवासी भागात गरिबीमुळे होणारे आजार सर्वाधिक असल्याचे व आदिवासी नागरिकांची सहनशिलता प्रचंड असल्याचे सांगितले.मुंबई येथील लक्ष्मण गोळे सुरुवातीला कुख्यात गुन्हेगार होते. एक दिवस महात्मा गांधी यांचे ‘सत्याचे प्रयोग’ पुस्तक हातात आले आणि त्यांच्या जगण्याची वाटच बदलली. त्यांनी स्वत:च्या जीवनातही सत्याचे प्रयोग करण्याचा निश्चय केला. न्यायालयासमक्ष गुन्हे कबूल केले, शिक्षा भोगली. यानंतर कायदेशीर मार्गाने जीवन जगायला सुरुवात केली. ते आता इतर नागरिकांना सन्मार्गाने चालण्याचे मार्गदर्शन करतात. आजचे प्रतिष्ठापूर्ण जीवन घडविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. सूत्र संचालन रेणुका देशकर यांनी केले.(प्रतिनिधी)