शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल संपले, १०० बसेस ठप्प : नागपूरच्या गणेशपेठ आगारातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 20:51 IST

एसटीच्या गणेशपेठ आगारातील जवळपास १०० बसेस गुरुवारी डिझेल संपल्यामुळे आणि शुक्रवारी दुपारपर्यंत डिझेलचा टँकर न आल्यामुळे ठप्प झाल्या. डिझेलअभावी १७ हजार किलोमीटरच्या फेऱ्या रद्द करण्याची नामुश्की महामंडळावर आली.

ठळक मुद्देहजारो प्रवाशांची गैरसोय, १७ हजार किलोमीटर झाले रद्द

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एसटीच्या गणेशपेठ आगारातील जवळपास १०० बसेस गुरुवारी डिझेल संपल्यामुळे आणि शुक्रवारी दुपारपर्यंत डिझेलचा टँकर न आल्यामुळे ठप्प झाल्या. डिझेलअभावी १७ हजार किलोमीटरच्या फेऱ्या रद्द करण्याची नामुश्की महामंडळावर आली. त्यामुळे गणेशपेठ आगाराला तब्बल ३.५० लाखाचा फटका बसला. तर बसेस रद्द झाल्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांना खाजगी वाहतुकीकडे वळावे लागले.एसटी महामंडळाला अलीकडच्या काळात आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. वेळेवर पैशांची जुळवाजुळव करून डिझेलच्या टँकरसाठी पैसे भरणे विभाग नियंत्रक कार्यालयाला जमले नाही. त्यामुळे गुरुवारी दुपारी ३ वाजता गणेशपेठ आगारातील डिझेल संपले. डिझेल संपण्यापूर्वी टँकर बुक करणे आवश्यक होते. परंतु पैशांअभावी विभाग नियंत्रक कार्यालयाने डिझेलच्या टँकरचे बुकिंग केले नाही. त्यामुळे गणेशपेठ आगारात उभ्या असलेल्या बसेसमधून डिझेल काढून ते लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेसमध्ये टाकून या बसेस रवाना करण्यात आल्या. एसटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी ३ वाजेपासून शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत जवळपास १७ हजार किलोमीटरच्या फेऱ्या रद्द करण्याची नामुश्की एसटी महामंडळावर आली. यात १०० पेक्षा अधिक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे गणेशपेठ आगाराला ३.५० लाखाचा फटका बसला आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता डिझेलचा टँकर आल्यानंतर गणेशपेठ आगारातील बसेस नियमित सुरु झाल्या. परंतु प्रवासासाठी आलेल्या हजारो प्रवाशांना आल्यापावली परत जाण्याची पाळी आल्यामुळे त्यांची गैरसोय झाली. आजपर्यंत चालक, वाहक नसल्यामुळे बस फेऱ्या रद्द कराव्या लागत होत्या. परंतु डिझेल संपल्यामुळे बस फेऱ्या रद्द करण्याचा प्रकार मागील महिन्यापासून सुरु आहे. या परिस्थितीवर एसटी महामंडळाने गंभीरपणे विचार करून आर्थिक परिस्थिती सुधारण्याची गरज निर्माण झाली आहे.प्रवासी कमी झाल्यामुळे आर्थिक टंचाईथंडी आणि पावसामुळे अचानक एसटीचे प्रवासी कमी झाले. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे डिझेलच्या टँकरसाठी पैशांची जुळवाजुळव करून पैसे भरणे अलिकडच्या काळात शक्य होत नाही. त्याचा परिणाम डिझेल संपून बसेस रद्द कराव्या लागत असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Dieselडिझेलstate transportएसटी