शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ड्रेसच दिला नाही अन् म्हणे स्वच्छ ड्रेस घालून या! चालक, वाहकांना कारवाईची तंबी : एसटी महाव्यवस्थापकांचे विभाग नियंत्रकांना पत्र

By नरेश डोंगरे | Updated: March 30, 2023 20:15 IST

अलिकडच्या काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांना वर्षातून दोन गणवेष दिले जायचे. धुलाई भत्ताही मिळायचा.

नागपूर : एसटी बसमध्ये कर्तव्यावर रुजू होताना जे चालक, वाहक स्वच्छ गणवेष घालून येणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी दिले आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे, गेल्या चार वर्षापासून एसटीच्या चालक, वाहकांना गणवेषच (ड्रेस) देण्यात आलेला नाही. असे असताना आता अचानक आदेश काढून कारवाईची तंबी देण्यात आल्याने राज्यातील एसटी महामंडळाच्या चालक, वाहकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात एसटी महामंडळात एकूण ६० हजारांवर चालक वाहक (ड्रायव्हर, कण्डक्टर) सेवारत आहेत. अलिकडच्या काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांना वर्षातून दोन गणवेष दिले जायचे. धुलाई भत्ताही मिळायचा. दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना एसटीच्या चालक वाहकांना गणवेष देण्यात आला. त्यावर ठिकठिकाणी रेडिअम, डिझाईन असल्याने हा गणवेष टीका वजा चर्चेचा विषय ठरला होता.

महिला चालक वाहकांचा गणवेष शाळकरी मुलींसारखा दिसत असल्याचीही ओरड झाली होती. दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून मात्र हजारो चालक-वाहकांना गणवेषच मिळाला नाही. त्यामुळे बहुतांश चालक वाहक आपले नेहमीचे कपडे घालून कर्तव्यावर येतात. काही जण नेम प्लेट, बॅज (बिल्ला) अन् लायसेन्सही जवळ बाळगत नसल्याचे ठिकठिकाणी अधिकाऱ्यांना दिसून आले आहे.

या पार्श्वभूमीवर, एसटीचे (वाहतूक) महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील ३० विभाग नियंत्रकांना पत्र पाठवून 'जे चालक, वाहक स्वच्छ गणवेष घालून येणार नाही, त्यांच्यावर कारवाई करा', असे आदेश दिले आहेत. या कारवाईची स्वतंत्र नोंद करून ती महाव्यवस्थापक कार्यालयाला कळवा, असेही या आदेश वजा पत्रात नमूद आहे.

नंतरच आदेश लागू करा : कर्मचारी, संघटनाशिस्तीचा भाग म्हणून चालक वाहकांनीच नव्हे तर प्रत्येक कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठरवून दिलेला शासकीय गणवेष घालायलाच हवा. मात्र, गणवेषच दिला नसताना तो घालून येण्याची सक्ती तसेच कारवाईचीही तंबी कशी दिली जाऊ शकते, असे प्रश्न चालक, वाहकांकडून उपस्थित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, नवीन गणवेष द्या, त्यानंतरच हा आदेश लागू करा, अशी मागणी एसटी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांनी केली आहे.

लवकरच नवीन गणवेष : महाव्यवस्थापक जगताप

नवीन गणवेष देण्यासंबंधाने महामंडळाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. महिनाभरातच एसटीच्या चालक, वाहकांना नवीन गणवेष मिळणार आहे. प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हिताची काळजी आहेच. मात्र, शिस्त आणि चांगुलपणाही महत्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी यासंबंधाने 'लोकमत'शी बोलताना दिली.

टॅग्स :nagpurनागपूर