शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेत असताना झोपले होते का? जि.प.च्या ७७ कोटीच्या निधीवरून राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 20:18 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकून पडलेला ७७ कोटी रुपयांच्या निधीवरून आता राजकारण तापले आहे. विरोधकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. विरोधकांच्या मागणीला उत्तर देताना जि.प.च्या सत्ताधाऱ्यांनी ७ वर्षे सत्तेत असताना झोपले होते का? असा प्रतिप्रश्न करीत विरोधकांनाच टार्गेट केले आहे.

ठळक मुद्देसत्ताधाऱ्यांचा विरोधकांवर आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकून पडलेला ७७ कोटी रुपयांच्या निधीवरून आता राजकारण तापले आहे. विरोधकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. विरोधकांच्या मागणीला उत्तर देताना जि.प.च्या सत्ताधाऱ्यांनी ७ वर्षे सत्तेत असताना झोपले होते का? असा प्रतिप्रश्न करीत विरोधकांनाच टार्गेट केले आहे.शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेने अखर्चित असलेला ८० कोटी रुपयांचा निधी सरकारच्या कोषात जमा केला आहे. परंतु २०१३-१४ पासून ठेवीच्या स्वरूपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७७ कोटी रुपयांचा निधी अडकला आहे. अखर्चित निधीचा लेखाजोखा मांडताना जिल्हा परिषदेने ७७ कोटीच्या निधीचा त्यात समावेश केला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने बँकेत अडकलेल्या ७७ कोटीचा हिशेब द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अनिल निधान यांनी केली होती.पूर्वी जिल्हा परिषदेचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते होते. शासनाकडून येणारा निधी हा बँकेत जमा केला जायचा. परंतु बँक अवसायनात आल्याने ७७ कोटीचा निधी बँकेत अडकला आहे. शासनाने बँकेकडून जिल्हा परिषदेला निधी परत मिळण्यासाठी मदत करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. यासंदर्भात वित्त सभापती भारती पाटील म्हणाल्या की, वित्त विभागाचा बँकेशी पत्रव्यवहार सुरू आहे. आम्ही हा निधी कसा परत आणता येईल, यासाठी पूर्ण प्रयत्न करू.आरोप करणाऱ्यांची सत्ता जिल्हा परिषदेत ७ वर्षे होती. या दरम्यान त्यांनी निधी परत आणण्यासाठी काय केले, याचे स्पष्टीकरण द्यावे आणि नंतरच आरोप करावा.तापेश्वर वैद्य, कृषी सभापती, जि.प.सत्ता असताना गप्प का होतेजिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असताना काय दिवे लावले, हे सरकारी कोषात जमा झालेल्या अखर्चित निधीवरून लक्षात येते. जनतेच्या हक्काचा ८० कोटीचा निधी परत पाठविण्याची वेळ जि.प.वर आली आहे. ७७ कोटीचासुद्धा निधी यांच्याच कार्यकाळातील आहे. तेव्हा राज्यात आणि केंद्रातही त्यांची सत्ता होती. ७ वर्षे सत्ताधारी गप्प होते. तेव्हा १ रुपयाही निधी परत आणला नाही.मनोहर कुंभारे, उपाध्यक्ष, जि.प.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरPoliticsराजकारण