शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाची थेट निवड रद्द करणे हुकूमशाही निर्णय : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 22:42 IST

सरपंचांची जनतेतून निवड करण्याचा निर्णय यापूर्वीच्या भाजपा शासनाने घेतला होता. पण महाविकास आघाडीने बहुमताच्या जोरावर हा निर्णय रद्द करून ग्रामपंचायत सदस्यांमार्फतच सरपंचांची निवड करण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देविकासकामे बंद पाडण्याचे कारस्थान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरपंचांची जनतेतून निवड करण्याचा निर्णय यापूर्वीच्या भाजपा शासनाने घेतला होता. पण महाविकास आघाडीने बहुमताच्या जोरावर हा निर्णय रद्द करून ग्रामपंचायत सदस्यांमार्फतच सरपंचांची निवड करण्याचा निर्णय घेतला. हा हुकूमशाही निर्णय असल्याची टीका करीत माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रपरिषदेत राज्य शासनाचा निषेध केला.बावनकुळे म्हणाले, शासनाने घेतलेल्या या निर्णयाच्या बाजूने बहुतांश सरपंच नाहीत. शासनाने फेरविचार करावा. केवळ राजकीय हेतूने प्रेरित निर्णय घेण्यात आला. वास्तविक आपल्या गावाचा सरपंच निवडण्याचा अधिकार त्या गावातील जनतेला भाजपा शासनाने दिला होता. तसेच नगर परिषदा, नगर पंचायतींच्या निधीत कपात करून कामे बंद पाडण्याचे कारस्थान राज्य शासन करीत असून जिल्ह्यातून ५०० कोटी रुपयांचा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे विकास कामांमध्ये अडथळे येणार असल्याचेही ते म्हणाले.१०० युनिट नि:शुल्क विजेची घोषणा पूर्ण करावीराज्यातील अडीच कोटी ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज नि:शुल्क देण्याचा निर्णय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतला असून तो अभिनंदन करणाराच आहे. या निर्णयामुळे अनेक गरीब कुटुंबांना त्याचा लाभ होणार आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाला विरोध करून ऊर्जामंत्र्यांच्या घोषणेला हरताळ फासली आहे. ऊर्जामंत्र्यांनी १०० युनिटसाठी लागणारा निधी महावितरणला द्यावा आणि आपली घोषणा प्रत्यक्षात आणावी, असेही बावनकुळे यांनी म्हटले. विजेचे व्यवस्थापन योग्यरीत्या केले तर राज्यात भारनियमन करण्याची गरज नसल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. राज्यात विजेचा तुटवडा नाही. याशिवाय खुल्या बाजारातही वीज उपलब्ध आहे. राज्यात भारनियमन बंद करणारे भाजपा शासन हे पहिले शासन आहे. आमच्या काळात राज्यात कुठेही भारनियमन झाले नाही. आताही भारनियमन करण्याची गरज पडणार नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेsarpanchसरपंचMediaमाध्यमे