संवाद संपला, विकास थांबला! नगरसेवकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 09:23 PM2020-06-24T21:23:58+5:302020-06-24T21:24:34+5:30

आयुक्तांशी संवाद नसल्याने शहरातील विकास थांबल्याचा सूर मनपाच्या सर्वसाधारण सभेचा होता. स्थगन प्रस्तावावर बुधवारी सलग दुसऱ्या  दिवशीही वादळी चर्चा झाली.

Dialog ended, development stopped! Allegations of corporators in Nagpur | संवाद संपला, विकास थांबला! नगरसेवकांचा आरोप

संवाद संपला, विकास थांबला! नगरसेवकांचा आरोप

googlenewsNext
ठळक मुद्देमनपा सभागृहात सलग दुसऱ्या दिवशी स्थगन प्रस्तावावर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नगरसेवक घोटाळेबाज असल्याची प्रतिमा सोशल मीडियावर निर्माण करण्यात आली. शाळा, गडर लाईन, नाल्या अशी अत्यावश्यक कामे थांबली. नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे प्रतिसाद देत नाहीत. आयुक्तांशी संवाद नसल्याने शहरातील विकास थांबल्याचा सूर मनपाच्या सर्वसाधारण सभेचा होता. स्थगन प्रस्तावावर बुधवारी सलग दुसऱ्या  दिवशीही वादळी चर्चा झाली.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर राजकारण करत आहे. ९ हजार पोलवर दिवे लागले नाही. अत्यावश्यक कामे ठप्प झाली. झाडे लावण्याचे काम थांबले. आयुक्त पैसे नाही म्हणून सांगतात. स्मार्ट सिटीची कामे थांबली. मुंढे आल्यापासून एकाही नगरसेवकाला चेंबरचे काम करता येत नाही. कामे होत नसेल तर आयुक्तांनी नागपुरातून निघून जावे, अशी भूमिका प्रदीप पोहाणे यांनी मांडली. संबंधित नगरसेवकांना काही अडचण निर्माण झाल्यास झोन अधिकाऱ्यांनी कामे सोडविणे आवश्यक आहे.पण ४७ पत्र दिले तरी करवाई होत नाही. अशा अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी संजय महाकाळकर यांनी केली.

दिव्या धुरडे म्हणाल्या, आज नगरसेवकाची चेंबर बनविण्याची लायकी ठेवली नाही. वर्कआॅर्डर झालेली कामे थांबवली. इब्राहिम टेलर म्हणाले, प्रभागातील कामे होत नसल्याने नगरसेवकांना शिव्या देत आहेत. कामे होत नसेल तर मनपा बरखास्त करा.
रमेश पुणेकर म्हणाले,नितीन साठवणे याच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा. बांगला देश येथे बिर्याणी पार्टी झाली नसताना पार्टी झाल्याचा खोटा प्रचार केला. भागाला मनपा प्रशासनाने बदनाम केल्याने आयुक्तांनी माफी मागावी. हरीश ग्वालबंशी यांनी के. टी.नगर रुग्णालयाचा मुद्दा उपस्थित केला. चांगले काम केले तत्कालीन मुख्यमंत्री यांनी तुकाराम मुंढे याचा सत्कार केला. आता मनपातील भाजप सत्ताधारी मुंढे यांचा विरोध का करीत आहेत असा प्रश्न केला. बंटी कुकडे म्हणाले,नगरसेवकांवर गुन्हा दाखल करणे दुर्दैवी आहे. उद्या नालीच्या खड्ड्यात पडून एखाद्याचा मृत्यू झाल्यास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

मोहम्मद जमाल म्हणाले, नगरसेवकाची कामे थांबली आहे. दिलीप दिवे यांनी आयुक्तांना धारेवर धरले.मनपा शाळेत गरीब मुलांना इंग्रजी शिक्षण मिळावे यासाठी सहा शाळांच्या निविदा काढल्या. परंतु आयुक्तांनी रद्द केल्या. काँग्रेसचे बंटी शेळके व कमलेश चौधरी यांनी आयुक्त यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. आयुक्तांमुळे नागपूर शहरात कोरोनाला प्रतिबंध करण्यात यश मिळाले.४५० बेडचे हॉस्पिटल निर्माण झाले, अशी माहिती दिली. इब्राहीम टेलर, संजय बंगाले, वंदना चाफेकर आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

 

Web Title: Dialog ended, development stopped! Allegations of corporators in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.