लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिलेने घराजवळ खेळत असलेल्या लहान मुलाचा हात पकडताच ‘ती’ मुले पळविणारी असल्याचा समज करीत परिसरातील नागरिकांनी तिला लगेच घेरले. मात्र, पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठत नागरिकांना शांत केले आणि त्या महिलेची सुटका केली. ही घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करंभाड येथे मंगळवारी दुपारी घडली.जयश्री निनाद रामटेके (४०, रा. नारीरोड, जरीपटका, नागपूर) असे महिलेचे नाव आहे. जयश्री रामटेके या औषध विकण्याचा व्यवसाय करतात. त्या औषधी विकरण्यासाठी करंभाड येथील रस्त्याने फिरत असतानाच त्यांनी एका लहान मुलाचा हात पकडला आणि तुला असेच शिकविले काय, अशी विचारणा केली.ही बाब परिसरातील महिलांनी बघताच ती मुले पळविणारी असावी, असा संशय व्यक्त करीत त्यांनी त्या भागातील पुरुषांना सांगितले. क्षणार्धात ही बाब गावभर पसरली. त्यात गावातील नागरिकांनी तिला गाठून घेरले.याबाबत महिती मिळताच पोलिसांनीही लगेच घटनास्थळ गाठले. त्यांनी नागरिकांची समजूत काढून त्या महिलेची सुटका केली आणि पोलीस ठाण्यात आणले. त्यामुळे अनुचित प्रकार टळला.
नागपूरनजीक धुळे पुनरावृत्ती टळली :‘ती’ महिला थोडक्यात बचावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:05 IST
महिलेने घराजवळ खेळत असलेल्या लहान मुलाचा हात पकडताच ‘ती’ मुले पळविणारी असल्याचा समज करीत परिसरातील नागरिकांनी तिला लगेच घेरले. मात्र, पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठत नागरिकांना शांत केले आणि त्या महिलेची सुटका केली. ही घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करंभाड येथे मंगळवारी दुपारी घडली.
नागपूरनजीक धुळे पुनरावृत्ती टळली :‘ती’ महिला थोडक्यात बचावली
ठळक मुद्देनागरिकांनी घेरले : मुले पळविणारी असल्याचा संशय