शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

नोटबंदीवर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, राज ठाकरेंसह राष्ट्रवादीलाही फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 15:37 IST

देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज ठाकरे यांना फटकारलं आहे

नागपूर - नोटबंदी निर्णयानंतर देशात चलनात आलेली २ हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अचानक जाहीर केला. या नोटा बदलून घेण्यास अथवा बँकेत जमा करण्यास नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या निर्णयावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तू तू मै मै सुरू झाली आहे. या निर्णयाचं सत्ताधारी समर्थक करत आहेत. तर, विरोधकांनी यावरुन मोदी सरकारवर जबरी टीका करण्यास सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनपढ म्हणत मोदींना लक्ष्य केलं. तर, राज ठाकरे यांनीही हा निर्णय देशाला नुकसान पोहोचवणार असल्याचं म्हटलंय. आता, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज ठाकरे यांना फटकारलं आहे. राज ठाकरेंनी या निर्णयाला विरोध केला आहे, तर राष्ट्रवादीने या निर्णयाविरुद्ध आरबीआय कार्यालयाबाहेर निदर्शने सुरू केली आहेत. त्यावरुन, आता फडणवीसांनी पलटवार केलाय.

ऑक्टोबरपर्यंत या नोटा तुम्हाला बदलता येतील. ज्यांच्याकडे कायदेशीर नोटा आहेत, ज्यांच्याकडे पांढरा पैसा आहे, त्यांना चिंता करण्याची गरज नाही. कोणी काळा पैसा जमा करुन ठेवला असेल तर त्यांना त्रास नक्कीच होणार आहे. कारण, त्यांना हे सांगावं लागेल की इतक्या नोटा आल्या कुठून?, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज ठाकरे यांच्या या नोटबंदीचा विरोध केल्यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना राज ठाकरेंना एकप्रकारे टोलाच लगावला आहे.  

२००० रुपयांची नोट बंद करण्याचा किंवा नोटाबंदीचा फायदा हा, बाजारात सर्वात मोठ्या फेक नोटा आयएसआय (ISI) च्या माध्यमातून वापरात आणल्या जातात, त्यांना रोखण्यासाठी होतो, त्यांचा डाव उधळण्यासाठी या निर्णयाचा फायदा होतो. यापूर्वीच्या नोटबंदीवेळीही ती गोष्ट आपल्याला प्रामुख्याने जाणवली. जे इन्पुट मिळाले, त्यानुसार फेक करन्सीवर आपण बंदी घालू शकलो, असेही फडणवीसांनी म्हटले. 

हे निर्णय देशाला परवडणारे नसतात

हा धरसोडपणा आहे. तज्ज्ञांना विचारुन हा निर्णय झाला असता तर ही वेळ आली नसती. आता लोकांनी परत बँकेमध्ये पैसे टाकायचे, परत तुम्ही नवीन नोटा आणणार, असं सरकार चालतं का? असे प्रयोग होतात का?, असा निशाणा राज ठाकरेंनी लगावला. त्यावेळी जेव्हा नोटा आणल्या होत्या तेव्हा त्या एटीएममध्येही जात नव्हत्या. म्हणजे नोटा एटीएममध्ये जात आहेत की नाहीत हे देखील पाहिलं नव्हतं. नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.  ३० सप्टेंबरपर्यंत नोट चलनात

दरम्यान, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा एका रात्रीत बंद केल्या होत्या. त्यावेळीही नोटा बदलून घेण्यास वेळ दिला होता. यावेळी २ हजारांच्या नोटेच्याबाबतीत मात्र नोटा थेट बंद न करता ही नोट ३० सप्टेंबरपर्यंत चलनात कायम ठेवली आहे. तोवर त्या बँकांत जमा करता येतील. ३० सप्टेंबरनंतर काय? याबाबत आरबीआयने अद्याप काही म्हटलेले नाही. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसDemonetisationनिश्चलनीकरण