शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कोणी कितीही प्रयत्न केले, तरी माझे नाव मिटवता येणार नाही... फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोमणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2022 14:21 IST

ही संकल्पना २० वर्षांपासून माझ्या डोक्यात होती, मात्र या गोष्टीचा आनंद आहे की जे लोक या रस्त्याचा विरोध करत होते ते आता या महामार्गाचे उद्घाटन करत आहेत, असाही टोमणा फडणवीसांनी ठाकरे सरकारला मारला.

ठळक मुद्दे समृद्धी महामार्गावरून श्रेयवादाचे राजकारण

नागपूर : समृद्धी महामार्ग सुरू झाला पाहिजे, त्यासाठी मला आनंद आहे. पण, त्याची कामं अद्याप पूर्ण झालेली नाहीत. घाईघाईने उदघाटन केलं तर रस्ता सुरू होऊ शकतो, पण त्या रस्त्याला महत्व आहे. त्यामुळं कामं पूर्ण करावी नंतर उद्घाटन करावं, मात्र कधीही उद्घाटन झालं तरी त्याच स्वागतच करू, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून मे महिन्यात त्याचे उद्घाटन करण्याचे प्रस्तावित आहे. विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने समृद्धी महामार्गाचे महत्व वाढले आहे. तर, दुसरीकडे या रस्त्याच्या श्रेयाचा वाद निर्माण झाला आहे. यावर व्यक्त होताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोला हाणला. कोणी कितीही प्रयत्न केला तरी माझं नाव समृद्धी महामार्गवरून कोणी मिटवू शकत नाही, हे माझं श्रेय नाही, जनतेने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली, त्यामुळं हे काम करू शकलो, असे फडणवीस म्हणाले.

ही संकल्पना २० वर्षांपासून माझ्या डोक्यात होती, मात्र या गोष्टीचा आनंद आहे की जे लोक या रस्त्याचा विरोध करत होते ते आता या महामार्गाचे उद्घाटन करत आहेत, असाही टोमणा फडणवीसांनी मारला.

दरम्यान, नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे काम प्रगती पथावर आहे. साधारणपणे मे महिन्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याच्या हालचाली सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्धा जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा येथे समृद्धी महामार्ग तसेच पुलगावजवळ वन्यप्राण्यांच्या आवागमनासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाची पाहणी केली होती. तर, आता या महामार्गाच्या श्रेयावरून वाद निर्माण होऊ लागले असून फडणवीसांनी याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे