शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

...त्यामुळेच ही वेळ आली, ओबीसी आरक्षणप्रकरणी फडणवीसांनी ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 17:36 IST

यामुळे ओबीसी समाजाची अपरिमित हानी होणार असून याला राज्य सरकारच जबाबदार असल्याचे फडणवीस म्हणाले.

नागपूर : ओबीसी आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायायलाकडून राज्य सरकारला दणका मिळाला आहे. दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. हे संपूर्णत: राज्य सरकारचे अपयश असल्याचे फडणवीस म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं आहे, हे अद्याप मला समजलेलं नाही. पण जे प्राथमिकरित्या समजलं आहे ते असं आहे की, पाच वर्षे पूर्ण झालेले आहेत व सहा महिनापेक्षा जास्त काळ प्रशासक ठेवता येत नाही, संविधानाने तशी तरतूद ठेवलेली आहे. म्हणून अशा सगळ्या ठिकाणी तत्काळ निवडणुका लावण्यास सर्वोच्च न्यायालायने सांगितले आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

दोन वर्ष सरकारने ट्रिपल टेस्ट न करता टाईमपास केला त्यामुळेच ही वेळ आली. यावरून न्यायालयाने सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले व असा निर्णय दिला. यामुळे ओबीसी समाजाची अपरिमीत हानी होणार असून याला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. या संदर्भात आम्ही संपूर्ण निर्णय समजून घेऊ आणि त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असेही फडणवीस म्हणाले.

राणा दाम्पत्याला जामीन मिळणं स्वाभाविकच 

हनुमान चालिसा म्हणण्याकरता राजद्रोह लावण्याचा करंटेपणा या सरकारने केला. अशा प्रकारचा आरोप कधीच टिकू शकत नाही, त्यामुळे त्यांना जामीन मिळणं स्वाभाविकच आहे, असे फडणवीस म्हणाले.

भोंग्याप्रकरणी फडणवीस म्हणाले...

राज्य सरकार त्यांना जेलमध्ये टाकून राज द्रोहाचा गुन्हा लावू शकते. तर भोंग्यासंदर्भात त्यांची भूमिका काय असेल याची कल्पना आपल्या असायलाच हवी. न्यायलयाच्या निर्णयाचं पालन करणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि ते जर आपली भूमिका व्यवस्थित वठवत नसेल तर राज्यातील नेत्यांना आप-आपली भूमिका मांडावी लागेल, असे फडणवीस म्हणाले.

अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात एक साम्य

अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या ट्विटरवॉरबाबत प्रश्न विचारला असता फडणवीसांनी मिश्कील उत्तर दिले. माझ्या पत्नीत आणि मुख्यमंत्र्यांमध्ये एका गोष्टीच साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणं सोडत नाही व माझी पत्नी नको त्या गोष्टीला उत्तर देणं सोडत नाही असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणPoliticsराजकारणOBCअन्य मागासवर्गीय जातीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी