शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लांगूल चालनाची नीती काँग्रेसनं भारतात आणली, देवेंद्र फडणवीसांचा घाणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 16:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला एक दिशा मिळत आहे, त्यामुळे मोदींच्या प्रति खूप मोठ्या प्रमाणात लोकं आकृष्ट होत असून त्यामुळे त्यांची ही मळमळ बाहेर येत असल्याचे फडणवीस म्हणाले.

नागपूर : भारतात पूर्ण शांतता आहे. गेली अनेक वर्ष जी लांगूल चालनीची नीती काँग्रेस पक्षाने भारतात आणली त्यामुळे समाजात दुफळी निर्माण झाली, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

पुढे बोलताना, ही दुफळी दूर करून आपण सगळे एका भारतमातेचे पूत्र आहोत अशाप्रकारची भावना देशात तयार करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. तसेच, देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्व देत आहेत. त्यामुळे मोदींच्या प्रति खूप मोठ्या प्रमाणात लोकं आकृष्ट होत असून त्यांची ही मळमळ बाहेर येत आहे, असे म्हणत फडणवीसांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

...तर ओबीसी आरक्षण गेलं नसतं

कोर्टाने दाखल केलेल्या आरोपपत्रांमध्ये नवाब मलिक यांचा 'डी गँग'शी संबंध असल्याचे म्हटले आहे, या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ही अतिशय गंभीर बाब आहे. पण या सरकारचं बघा, इम्पेरिकल डेटा तयार करण्याकरता कुठलीच धडपड करत नाही. ओबीसी आरक्षणासाठी कुठलीच धडपड करत नाही. मात्र, त्याचवेळी जेलमध्ये असलेले आणि डी गँगशी संबंध असलेले नवाब मलिक हे मंत्रीमंडळात राहायला पाहिजे याकरता या सरकारची धडपड आपण पाहतोय. यापेक्षा अर्धी धडपड जर ओबीसी आरक्षणाचा इम्पेरिकल डेटा जमा करण्याकरता या सरकारने केली असती तर ओबीसी आरक्षण गेलं नसतं, अशी टीका त्यांनी केली.

डी गँगशी नवाब मलिकांचे असलेले संबंध या आरोपपत्राच्या माध्यमातून समोर येत आहेत. मात्र त्यानंतरही सरकार त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात आहे. अजूनही ते मंत्रीमंडळात असून मुख्यमंत्र्यांना 'डी गँग'शी संबंधित मंत्र्यांबरोबर काम करायचे असल्याचे दिसून येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीnawab malikनवाब मलिकOBC Reservationओबीसी आरक्षण