शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis : महाविकास आघाडीनं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची कत्तल केली; फडणवीसांनी डागले टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2022 13:07 IST

विश्वासघाताचे राजकारण दोन वर्षांपासून सातत्याने तयार होत असल्याची टीका फडणवीसांनी केली. 

नागपूर : ओबीसी आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला खडे बोल सुनावले. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होत आहेत, हे दुर्दैवी आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाची कत्तल या सरकारनं केली आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. ते ओबीसी मेळाव्यात बोलत होते.

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुका होत आहेत. सरकारने ७ वेळा वेळ मागून साधा आयोगही गठीत केला नाही. इम्पेरिकल डेटा तयार केला नाही. कोर्टाने याबाबत निरीक्षण नोंदवले व या सरकारला वेळ देऊन तुम्ही ट्रिपल टेस्ट केली नाही असे म्हणत कलम स्थगित केले, असे फडणवीस म्हणाले. 

या सरकारला न्यायालयाने झापले. राज्य सरकारने कुठला तरी डेटा घेतला व सादर केला. सर्वोच्च न्यायालय भडकले त्यांनी सांगितले की हा मुख्यमंत्री यांच्यासमोर दिला आहे. कोर्टाने नाकारले आणि निवडणूका लावायला सांगितले. विश्वासघाताचे राजकारण दोन वर्षांपासून सातत्याने तयार होत असल्याची टीका फडणवीसांनी केली. 

'ओबीसी' भाजपचा डिएनए 'ओबीसी' हा भारतीय जनता पक्षाचा डिएनए आहे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. आज ज्या प्रकारे ओबीसींवर अन्याय होत आहे, महाज्योतीच्या माध्यमातून तयार केलेल्या स्ट्रक्चरला गालबोट लावले जात आहे. महाविकास आघाडीच्या मालकांना ओबीसींच्या हिताचं काही पडलेलं नाही. ते कधीच ओबीसींना आरक्षण मिळू देणार नाही, हे रोज काहीतरी नवीन अडंगा टाकतील व बोट आपल्याकडे दाखवतील, असा आरोप फडणवीसांनी केला. यासह आरक्षण असो किंवा नसो २७ टक्के जागांवर ओबीसी उमदेवार देणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ओबीसी आघाडीला प्रयत्नांची शर्थ करून या सरकारचा ओबीसी विरोधी चेहरा उघडा पाडायचा आहे. ओबीसी समाजाच्या न्यायीक हक्काकरता भाजप लढा देईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी