शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज काढून नागपूर शहराचा विकास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 22:46 IST

स्मार्ट सिटी करण्यासाठी उपराजधानीत विकासाची विविध कामे सुरू आहेत. तर काही प्रस्तावित आहेत. परंतु तिजोरीत पैसा नसल्याने महापालिकेला विकास कामासाठी कर्ज घ्यावे लागणार आहे. शहरातील सुरू असलेले व प्रस्तावित विकास प्रकल्प विचारात घेता महापालिकेला पुढील पाच ते सात वर्षात २०४७.४५ कोटींचा आर्थिक बोजा उचलावा लागणार आहे. यासाठी महापालिका २०० कोटींचे कर्ज घेणार आहे.

ठळक मुद्देमनपा सभागृहात प्रस्ताव : सात वर्षात २०४७ कोटींची देणी द्यावी लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटी करण्यासाठी उपराजधानीत विकासाची विविध कामे सुरू आहेत. तर काही प्रस्तावित आहेत. परंतु तिजोरीत पैसा नसल्याने महापालिकेला विकास कामासाठी कर्ज घ्यावे लागणार आहे. शहरातील सुरू असलेले व प्रस्तावित विकास प्रकल्प विचारात घेता महापालिकेला पुढील पाच ते सात वर्षात २०४७.४५ कोटींचा आर्थिक बोजा उचलावा लागणार आहे. यासाठी महापालिका २०० कोटींचे कर्ज घेणार आहे.कर्जासोबतच नागपूर शहराच्या सुधारित विकास आराखड्यानुसार अनधिकृत बांधकामे शुल्क आकारून नियमित करणे, मौजा गाडगा येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आदी प्रस्तावांना मंजुरी घेण्यासाठी मंगळवारी महापालिकेची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. अचानक सभा आयोजित करण्यात आल्याने महापालिकेत उलटसुलट चर्चा आहे.महापालिका आयुक्त अश्विन मुदगल यांनी अर्थसंकल्प सादर करताना २०० कोटींचे कर्ज घेण्याची घोषणा केली होती. वास्तविक स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात कर्जाचा समावेश करून हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविता आला असता. परंतु स्थायी समितीच्या अर्थसंकल्पापूर्वी विशेष सभा आयोजित करून कर्जाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या डोक्यावर आधीचे ६०० कोटींचे कर्ज आहे. मात्र महापालिके च्या वित्त विभागातर्फे मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या प्रस्तावात पुढील पाच ते सात वर्षात महापालिकेला विविध १२ योजनांवर २०४७.४५ कोटींची गरज भासणार आहे. यात स्मार्ट सिटीसाठी सर्वाधिक ६५८.७८ कोटींच्या निधीचा समावेश आहे.महापालिकेने पेंच टप्पा ४ साठी महाराष्ट्र बँकेकडून २०० कोटींचे कर्ज घेतले होते. ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत या कर्जाची परतफेड होईल. यासोबत नवीन २०० कोटींचे कर्ज घेण्यात येईल. त्यामुळे महापालिकेवर कर्जाचा बोजा वाढणार नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे.प्रकल्पाचे नाव व मनपाच्या दायित्वाचा प्रकार        रक्कम (कोटीत)स्मार्ट सिटी (२६३५.११ कोटीत मनपाचा २५ टक्के वाटा ) ६५८.७८शहरातील सिमेंट रस्ते, टप्पा -१ व टप्पा -२                     २००.००शहर परिवहन सेवा (तूट भरून काढणे)                          १०८.००अमृत योजनेच्या प्रकल्पात मनपाचा वाटा                    ११३.३५हुडकेश्वर-नरसाळा पाणीपुरवठा योजना व रस्ते            २५ .००पथदिव्यांचे एलईडी दिव्यात रूपांतर करणे                   २७०.४८भांडेवाडी एसटीपी प्रकल्प                                            १३०.००वेस्ट टू एनर्जी                                                              ९०.००घनकचरा व्यवस्थापनातील वाटा                               २११.७८मेट्रो रेल्वे प्रकल्पातील वाटा                                      ७३.००नासुप्रला द्यावयाचे वैधानिक अशंदान                       ५२.७८झोपडपट्टी पुनर्वसनातील विविध कामे                    ११४.२८भविष्यात मनपावर येणारे एकूण वित्तीय दायित्व     २०४७.४५

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर