शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  कामगार रुग्णालयाच्या विकासाला गती येणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 01:26 IST

कामगारांच्या वेतनातील थेट रक्कम जमा होण्यासाठी व विमा लाभार्थ्यांना वैद्यकीय सुविधेत सुलभता आणण्यासाठी राज्य कामगार विमा महामंडळाची स्थापना रद्द करून, त्याऐवजी महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्षपदाच्या नेमणुकीला घेऊन तिढा निर्माण झाला होता. अखेर शुक्रवारी यावर निर्णय घेण्यात आल्याने व सोसायटीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी शिखर समिती स्थापन करण्यात आल्याने, राज्यातील कामगार रुग्णालयाच्या विकासाला गती येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देसोसायटी अध्यक्षपदाचा तिढा सुटला : शिखर समितीही स्थापन करण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामगारांच्या वेतनातील थेट रक्कम जमा होण्यासाठी व विमा लाभार्थ्यांना वैद्यकीय सुविधेत सुलभता आणण्यासाठी राज्य कामगार विमा महामंडळाची स्थापना रद्द करून, त्याऐवजी महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्षपदाच्या नेमणुकीला घेऊन तिढा निर्माण झाला होता. अखेर शुक्रवारी यावर निर्णय घेण्यात आल्याने व सोसायटीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी शिखर समिती स्थापन करण्यात आल्याने, राज्यातील कामगार रुग्णालयाच्या विकासाला गती येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.स्वतंत्र राज्यस्तरीय महामंडळाची स्थापना २१ जून २०१६ रोजी शासन निर्णयाद्वारे करण्यात आली होती. तथापि, कामगार विमा महामंडळाच्या ६ डिसेंबर २०१७ व १६ फेबु्रवारी २०१८ रोजी पार पडलेल्या बैठकांमध्ये राज्य कामगार विमा योजनेकरिता राज्य कामगार विमा सोसायटी स्थापन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. २४ एप्रिल २०१८ रोजी राज्य शासनाने कामगार विमा महामंडळाची स्थापना रद्द करून, त्याऐवजी राज्य कामगार विमा सोसायटीची स्थापना केली. महामंडळाकडून येणारी रक्कम थेट सोसायटीत जमा होईल आणि निर्णय जलदगतीने घेण्यात येऊन विमा लाभार्थींना वैद्यकीय सुविधा अधिक सुलभतेने वपरिणामकारकरीत्या पुरविता येतील, असा शासनाला विश्वास होता. परंतु ऐनवेळी सोसायटीच्या अध्यक्षपदाचा तिढा निर्माण झाला. अखेर ११ जानेवारी रोजी सोसायटीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी राज्याचे मुख्य सचिव यांची नेमणूक करण्यात आली. या मंडळात उपाध्यक्षपदी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव किंवा प्रधान सचिव यांच्यासह सात सदस्य व एक सदस्य सचिव असणार आहेत. या निर्णयाने सोसायटीच्या कामकाजाला वेग येण्याची शक्यता आहे.शिखर समिती घेणार सोसायटीच्या कामाचा आढावाराज्य कामगार विमा सोसायटीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी ‘शिखर समिती’ स्थापन करण्याचा निर्णयही ११ जानेवारी रोजी शासनाने घेतला. या समितीच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक आरोग्यमंत्री असणार असून, वित्त व नियोजन मंत्री सदस्य, कामगार मंत्री सदस्य व राज्य कामगार विमा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य सचिव असणार आहेत. या समितीची बैठक सहा महिन्यातून एकदा होणार आहे. यामुळे प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारीhospitalहॉस्पिटल