शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांशी संबंधित ४१ ऐतिहासिक स्थळांचा होणार विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 22:22 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या ४१ स्थळांचा विकास राज्य शासनातर्फे करण्यात येणार आहे. यापैकी २८ स्थळांसाठी शासनाने तब्बल ३३ कोटी ७८ लाख ६ हजार २४७ रुपये उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशिवाय महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे यांच्याशी संबंधित स्थळांचाही समावेश आहे, हे विशेष.

ठळक मुद्देराज्य शासनाकडून ३३ कोटी ७८ लक्ष रुपये उपलब्ध अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, लहुजी साळवे यांच्याशी संबंधित स्थळांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या ४१ स्थळांचा विकास राज्य शासनातर्फे करण्यात येणार आहे. यापैकी २८ स्थळांसाठी शासनाने तब्बल ३३ कोटी ७८ लाख ६ हजार २४७ रुपये उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशिवाय महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे यांच्याशी संबंधित स्थळांचाही समावेश आहे, हे विशेष. 

राज्य शासनातर्फे ज्या ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, त्यात चंद्रपूर येथील दीक्षाभूमीसाठी १ कोटी ९८ लाख १५हजार ३०० रुपये, मौजे आरग ता. मिरज, जि. सांगली (२ कोटी ६ लाख), मेव्हना राजा ता. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा चोखामेळा यांचे जन्मस्थान (५१ लाख ८२ हजार), अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव असलेले वाटेगाव ता. वाळवा. जि. सांगली (५० लाख ६३ हजार), पातुर्डा ता. संग्रामपूर जि. बुलडाणा (मातीचा बुद्धविहार) ९९ लाख ९२ हजार, तळेगाव दाभाडे (१ कोटी ११ लाख), माणगाव पहिली परिषद २ कोटी ३८ लाख , देहूरोड येथील बुद्धविहार (५१ लाख), महाड चवदारतळे महाड, जि. रायगड ( १ कोटी ३७ लाख), सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव जि. सातारा, रमाई यांचे माहेर वणंद ता. दापोली, जि. रत्नागिरी ( १ कोटी ८३ लाख) आंबेटेंबे मुरबाड जि. ठाणे, क्रांतिस्तंभ महाड (४ कोटी २९ लाख) आदींचा समावेश आहे. यासोबतच भिडे वाडा पुणे, एल्फिन्स्टन हायस्कूल मुंबई, चरी अलीबाग, अंबावडे गाव, माता रमाई यांचे वरळी स्मशानभूमी येथे स्मारक, मिलिंद कॉलेज, लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक संगमवाडी जि. पुणे आदींचाही विकास करण्यात येणार आहे.समितीची महत्त्वाची भूमिकाया ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या ठिकाणांच्या विकासाच्या दृष्टीने राज्य शासनाने एक समिती गठित केली होती. समाजकल्याण विभागाचे संचालक या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये एकूण १३ सदस्य आहेत. यात विविध विभागाच्या तज्ज्ञ सदस्यांसह सामाजिक कार्यकर्ते म्हणून कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांचाही समावेश आहे. या समितीने या स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन अभ्यास केला. तसेच कोणत्या बाबी या योजनेंतर्गत घ्याव्यात, याची मार्गदर्शक यादी तयार केली. संस्थांची निवड करण्याचे निकष तयार केले. समितीची रचना निश्चित केली. एका संस्थेत जास्तीत जास्त किती निधी देण्यात यावा, विभागनिहाय निधीचे कसे वाटप करावयाचे निकष निश्चित केले. ज्या संस्थांना अनुदान वितरित केले जाईल त्या संस्थेसोबत शासनाने तयार करावयाचा करारनाम्याचा नमुना तयार करून शासनाकडे तसा अहवाल सादर केला. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकली.४१ स्थळांपैकी बहुतांश स्थळांना आपण प्रत्यक्ष भेट देऊन त्याच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केले. त्यातील बहुतांश स्थळांना मोठ्या प्रमाणावर शासनाने निधी उपलब्ध करून दिला असल्याचे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष व समितीचे सदस्य कृष्णा इंगळे यांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरfundsनिधी