शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पर्यटनस्थळासारखा पुलांचा विकास करा

By admin | Updated: July 9, 2017 01:51 IST

पुलांचे बांधकाम करताना पुलांची डिझाईन अत्यंत आकर्षक असावी आणि ते बघण्यास सुंदर असल्यास

चंद्रकांत दादा पाटील यांचे प्रतिपादन : आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे बांधकाम परिषदेला सुरु वात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पुलांचे बांधकाम करताना पुलांची डिझाईन अत्यंत आकर्षक असावी आणि ते बघण्यास सुंदर असल्यास पर्यटनस्थळ म्हणूनही विकसित करण्याच्या दृष्टीने पुलांची निर्मिती करावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शनिवारी येथे केले. नागपुरात आयोजित आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे बांधकाम परिषदेच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झाले. या परिषदेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी क्षेत्रातील ४५० प्रतिनिधी उपस्थित आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशी, आयएडीएसईचे चेअरमन डी.ओ. तायडे, सचिव आय. के. पांडे, मुख्य अभियंता ए. के. बॅनर्जी, केंद्रीय रस्ते विकास विभागाचे विभागीय अधिकारी एम. चंद्रशेखर तसेच प्रकल्प संचालक, राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बांधकामाच्या क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सावित्री नदीवरील पुरामुळे वाहून गेलेला पूल बांधण्यासाठी १८० दिवसांची मुदत दिली होती. परंतु हा पूल १६५ दिवसातच पूर्ण करण्यात आला असल्याचे सांगताना चंद्रकांत पाटील म्हणाले, स्थापत्याच्या दृष्टीने पूल हा सुंदरच असायला हवा, तसेच टिकाऊसुद्धा राहील याकडे लक्ष देताना पुलाच्या सुंदरतेबद्दल पर्यटकसुद्धा आकर्षित व्हावेत यादृष्टीने तंत्रज्ञानाच्या विकासासाठी या परिषदेत विचारमंथन व्हावे. इंडियन नॅशनल ग्रुप आॅफ आयएबीएसई यांच्यातर्फेआयोजित आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे बांधकाम परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या सत्रात पुलांच्या अभियांत्रिकीसंदर्भात प्रा. महेश टंडन, अलोक भौमिक, मॉरगान टोलॅण्ड, दीपक सिंगला, एस.पी. खेडेकर, आशुतोष चंदावार, इर्विन व्हिसॅट, उमेश राजेशिलके तसेच डॉ. बी.सी. रॉय आदींनी मार्गदर्शन केले.