शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या दडपशाही धोरणांमुळेच रुपयाचे अवमूल्यन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 01:12 IST

शासनाच्या दडपशाही धोरणांमुळे देशातील अतिश्रीमंत कुटुंबीय देश सोडून जाताहेत. एका सर्वेक्षणानुसार देशातील ७५ हजार अतिश्रीमंत असलेल्या कुटुंबांनी हा देश सोडला आहे. जाताना त्यांनी तब्बल पाच लाख कोटी रुपयाची आपली संपत्तीही घेऊन गेले आहेत. त्यामुळेच अचानक डॉलरची किंमत वाढून रुपयाचे अवमूल्यन होत आहे अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत केली. आज देशाची अर्थव्यवस्था अतिशय बिकट अवस्थेत असून अर्थव्यवस्थेला व देशाला वाचवायचे असेल तर भाजप सरकार पुन्हा सत्तेत येता कामा नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे७५ हजार अतिश्रीमंत कुटुंब गेलेत देश सोडून : प्रकाश आंबेडकर यांची टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाच्या दडपशाही धोरणांमुळे देशातील अतिश्रीमंत कुटुंबीय देश सोडून जाताहेत. एका सर्वेक्षणानुसार देशातील ७५ हजार अतिश्रीमंत असलेल्या कुटुंबांनी हा देश सोडला आहे. जाताना त्यांनी तब्बल पाच लाख कोटी रुपयाची आपली संपत्तीही घेऊन गेले आहेत. त्यामुळेच अचानक डॉलरची किंमत वाढून रुपयाचे अवमूल्यन होत आहे अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत केली. आज देशाची अर्थव्यवस्था अतिशय बिकट अवस्थेत असून अर्थव्यवस्थेला व देशाला वाचवायचे असेल तर भाजप सरकार पुन्हा सत्तेत येता कामा नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.‘वर्ल्ड वेल्थ’ या जगप्रसिद्ध संस्थेचा अहवालाचा संदर्भ देत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, दहा कोटी रुपयाची उलाढाल असलेले लोक अतिश्रीमंत म्हणून गणले जातात. देशात अशा अतिश्रीमंत लोकांची संख्या जवळपास ३ लाख ३० हजार ४०० आहे. यापैकी २०१५ मध्ये ४ हजार, २०१६ मध्ये ६ हजार आणि २०१७ मध्ये ७ हजार अतिश्रीमंत कुटुंब देशातून निघून गेले आहेत. यात नीरव मोदीसारख्या बँक लुटणाऱ्यांचा संबंध नाही, ते वेगळे आहेत, असेही त्यांनी सांगितले.या परिस्थितीमुळे नजीकच्या काळात डॉलरचे भाव आणखी वाढतील आणि देशात महागाई वाढेल. आपण पुन्हा १९९० च्या अवस्थेत आलो आहोत. तेव्हा सावजनिक संस्था मजबूत होत्या. त्यामुळे वर्ल्ड बँकेने लादलेल्या अटीपासून आपण ती परिस्थिती निभावू शकलो. परंतु आतो आता ज्या अटी लादल्या जातील, त्या आपण सहन करू शकणार की नाही, अशी वेळ येईल, असा इशाराही त्यांनी वर्तविला. तसेच देशात सध्या गृहयुद्धासारखी परिस्थिती असून ती आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्षात खरी ठरू शकते असा धोकाही त्यांनी व्यक्त केला.पत्रपरिषदेला प्रदेश महासचिव सागर डबरासे, राजू लोखंडे, गुणवंत देवपारे, डॉ. संदीप नंदेश्वर आदी उपस्थित होते.कामगार कायदे बदलण्यासाठी ‘शहरी नक्षलवाद’ मोहीमनक्षलवादी असणे आणि त्यांच्याप्रती सहानुभूती ठेवणे वेगवेगळी बाब आहे. मुळात कामगार कायदे बदलवण्यासाठी राबवण्यात येत असलेली मोहीम म्हणजे शहरी नक्षलवाद होय. सत्तेवर असलेले कुणाचेही सरकार असो ते भांडवलदारांना खूष ठेवण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या ‘अनअकाऊंट फंड’साठी पोलीस हे मिळून ही मोहीम राबवत आहेत, अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली.‘दलित’ शब्दावर यापूर्वीही वाददलित हा शब्द वापरायचा की नाही, यावर १९८० मध्ये सुद्धा वाद निर्माण झाला होता. तेव्हा नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे यांच्यासारखे साहित्यिक एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने इतर सर्व साहित्यिक होते. तेव्हा ज्यांना हा शब्द वापरायचा आहे, त्यांनी वापरावा, ज्यांना वापरायचा नाही, त्यांनी वापरू नये, असे ठरले. हा निर्णय सर्वांनी मान्य केला. तो आजवर सर्वजण पाळत आले होते. न्यायालयाने सुद्धा हीच भूमिका घेतली आहे. शब्द वापरणे किंवा न वपरणे कंपलसरी नाही. अनेक ठिकाणी ओळख म्हणून तो शब्द वापरावाच लागतो. तेव्हा यावर पुन्हा वाद नको, अशी आमची भूमिका असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.ओवेसीसोबत मिळून लढणार, काँग्रेससोबतही आघाडीचे संकेतएमआयएमचे खा. ओवेसी यांचे पत्र मिळाले आहे. ते आमच्यासोबत यायला तयार आहेत. त्यांच्यासोबत आम्ही मिळून लढणार आहोत. २०१९ मध्ये भाजपाला हरवायचे असेल तर काँग्रेसला सर्वांना सोबत घ्यावे लागेल, असे सांगत काँग्रेससोबतही आघाडी होईल, अशी शक्यताही प्रकाश आंबेडकर यांनी वर्तविली.

 

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरnagpurनागपूर