शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात घरोघरी जाऊन घेणार कुष्ठरुग्णांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 11:14 IST

कुष्ठरुग्ण शोध अभियान येत्या १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्रत्येक सदस्यांची होणार तपासणी२१६४ पथके तयार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सक्रिय कुष्ठरुग्ण शोध अभियान, सक्रिय क्षयरोग शोधमोहिम तसेच असंसर्गजन्य प्रतिबंध जागरूकता अभियान येत्या १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. प्रत्यक्ष घरोघरी जाऊन घरामधील सर्व सदस्यांची कुष्ठरोग, क्षयरोग व असंसर्गजन्य आजारासाठी शारीरिक तपासणी आशा व स्वयंसेवक यांच्या चमूद्वारे करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागातील सर्व घरांचे व शहरी भागात निवडक भागाचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, ग्रामीण व शहरी भागांमध्ये एकूण २१६४ पथकाद्वारे सर्वेक्षण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.या अभियानांतर्गत समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे, नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे, नवीन कुष्ठरुग्णांमध्ये विकृतीचे प्रमाण दर १० लाख लोकसंख्यमागे एकपेक्षा कमी करणे, कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करणे, क्षयरोगाचे निदानाअभावी अद्यापही वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोपचारावर आणणे, मोहिमेमध्ये प्रशिक्षित पथकाद्वारे गृहभेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाºया व्यक्तींना शोधणे, संशयित क्षयरुग्णांचे थुंकी नमुने व एक्स-रे तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासणी करून क्षयरोगाचे निदान करणे आणि औषधोपचार सुरू करणे, समाजातील वय वर्ष ३० व अधिक वयोगटातील लोकांची तपासणी करून उच्च रक्तदाब, मधुमेह व कर्करोग या रोगांबाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच क्षयरोग, कुष्ठरोग निर्मूलनासाठी व असंसर्गजन्य रोगांबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे.सक्रिय कुष्ठरुग्ण शोध अभियान, सक्रिय क्षयरोग शोधमोहिम तसेच असंसर्गजन्य प्रतिबंध जागरूकता अभियान-२०१९ अभियानाबाबत समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात घेण्यात आली.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, कुष्ठरोग प्रशिक्षण केंद्राचे सहायक संचालक डॉ. विजय डोईफोडे, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. बी.एस. मडके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ए.एस.इनामदार, महानगरपालिकेच्या उपसंचालक डॉ. भावना सोनकुसरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ममता सोनसरे, समन्वयक डॉ. विनोद पाकधुने, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार आदी उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्य