शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

उपमहापौर पदावरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच

By admin | Updated: March 2, 2016 03:13 IST

राज्यात युतीचे सरकार असल्याने नागपूर महापालिकेतील उपमहापौरपद शिवसेनेला मिळावे, यासाठी शिवसेना आग्रही आहे तर आगामी निवडणूक विचारात घेता हे पद भाजपकडेच असावे,

महापालिकेतील राजकारण तापले : शिवसेनेची मोर्चेबांधणीनागपूर : राज्यात युतीचे सरकार असल्याने नागपूर महापालिकेतील उपमहापौरपद शिवसेनेला मिळावे, यासाठी शिवसेना आग्रही आहे तर आगामी निवडणूक विचारात घेता हे पद भाजपकडेच असावे, अशी भूमिका भाजपच्या काही नेत्यांनी घेतल्याने उपमहापौर पदावरून भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. गेल्या निवडणुकीत उपमहापौर पद शिवसेनेला देण्यासंदर्भात सहमती झाली होती. परंतु केवळ सहा नगरसेवक निवडून आल्याने शिवसेनेला उपमहापौर पद देण्याला भाजप नगरसेवकांनी विरोध केला होता. भाजपच्या जैतुनबी अशफाक अंसारी यांना उपमहापौर करण्यात आले होते. त्यानंतर नागपूर विकास आघाडीतील अपक्ष नगरसेवक मुन्ना पोकुलवार यांना उपमहापौर करण्यात आले. परंतु ते या पदावर संतुष्ट नव्हते. त्यामुळे त्यांना स्थायी समितीवर घेण्यात आले आहे. त्यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा महापौरांकडे सोपविला आहे. पुढील वर्षात निवडणुका असल्याने उपमहापौर पद शिवसेनेकडे असावे, यासाठी शिवसेना आग्रही असून बंडू तळवेकर यांनी यासाठी प्रयत्न चालविले आहे. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीही घेतल्या आहे. परंतु याची माहिती मिळताच भाजप नगसेवकांनी याला उघड विरोध दर्शविला आहे. महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांचे दोन गट आहेत. विधानसभा निवडणुकीत माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांना मदत केल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या नगरसेविका मंगला गवरे व शीतल घरत यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. दुसरीकडे स्थायी समितीसाठी शिवसेनेचे नगरसेवक जगतराम सिन्हा यांनी पक्षाचे गटनेते किशोर कुमेरिया यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेत बंडू तळवेकर व अलका दलाल हे दोघेच शिल्लक आहे. उपराजधानीत शिवसेनेचे अस्तित्व कायम असावे, यासाठी पक्षाच्या काही नगरसेवकांच्या जोरावर पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी राज्यातील युती विचारात घेता महपालिकेतील उपमहापौर पदावर दावा करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.(प्रतिनिधी)उपमहापौर भाजपचाचआगामी निवडणुका विचारात घेता अपक्ष गटाला डावलून उपमहापौरपद शिवसेनेला देण्याचा भाजपच्या काही नेत्यांचा विचार आहे. परंतु शिवसेनेला उपमहापौरपद देण्याला भाजप नगरसेवकांचा विरोध आहे. पक्षाचाच उपमहापौर असावा, अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे भाजपचाच उपमहापौर होणार असल्याचा दावा महापालिकेतील भाजपच्या एका नेत्याने केला आहे.