शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 22:39 IST

भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) उपमहानिरीक्षक दर्जाच्या २० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृहमंत्रालयातून आज जारी करण्यात आले. त्यात नागपुरातील पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे तसेच अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांचाही समावेश आहे.

ठळक मुद्देतांबडे यांच्याकडे गडचिरोली परिक्षेत्राची जबाबदारी : नागपुरात महावरकर अतिरिक्त आयुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) उपमहानिरीक्षक दर्जाच्या २० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृहमंत्रालयातून आज जारी करण्यात आले. त्यात नागपुरातील पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे तसेच अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांचाही समावेश आहे.अंकुश शिंदे गडचिरोली पोलीस परिक्षेत्राचे (नागपूर कॅम्प) उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते आता पदोन्नतीवर सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून बदलून गेले आहेत. शिंदे यांनी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात गडचिरोली गोंदियातील नक्षल्यांना बॅकफूटवर नेण्यात महत्त्वाची भूमिका वठविली. अनेक नक्षल्यांना आत्मसमर्पण करण्यास त्यांनी बाध्य केले. १ मे रोजी गडचिरोलीत घडलेला मोठा आघात आणि त्यानंतर त्यांनी नक्षल्यांची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी घेतलेली भूमिकाही चर्चेला आली.शिंदे यांच्या रिक्त जागेवर सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. बी. तांबडे यांची बदली झाली आहे. सोलापुरात तांबडे यांनी कम्युनिटी पुलिसिंगवर जास्त भर दिला. तेथील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा दत्तक योजना राबविली. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आणि गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी या योजनेचा त्यांनी चांगला वापर करून घेतला. त्यामुळे सोलापुरातील चोºया- घरफोड्या कमी करण्यातही त्यांनी यश मिळवले. सुट्यांचा कालावधी संपवून आपण नागपुरात नवी जबाबदारी घेण्यासाठी येत असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.अतिरिक्त आयुक्तांचा कोटा पूर्णसोलापूरलाच पोलीस उपायुक्त म्हणून सेवारत असलेले एस. एच. महावरकर यांची पदोन्नतीवर नागपूर शहरात बदली झाली आहे. येथे ते अतिरिक्त पोलीस आयुक्त (उत्तर प्रभाग) म्हणून रुजू होणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून नागपुरात अतिरिक्त पोलीस आयुक्त पदाच्या दोन जागा रिक्त होत्या. त्यातील उत्तर आणि दक्षिण विभागाच्या दोन्ही प्रभागाची जबाबदारी एकच अधिकारी सांभाळत होते. तिसरे गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारीही प्रभार म्हणून दुसरे अधिकारी सांभाळत होते. गेल्या आठवड्यात पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांची पदोन्नती झाली. त्यांना अतिरिक्त आयुक्त गुन्हे शाखा ही जबाबदारी मिळाली. तर, आज महावरकर यांची उत्तर प्रभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. हा प्रभार आतापावेतो अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर हेच सांभाळत होते.

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदली